पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

wwwwww ‘६ वे ] वंशावळी व माहिती १८५ ན་ཀའའའའའ པའ हरीदोक्षितांस रामकृष्ण या नांवाचा पुत्र होता असे हरीदीक्षित नाशिकास गेले असतां त्यांनी दिलेल्या लेखावरून दिसतें (वे. दाते यांजकडील लेख). | या घराण्यांतील व्यक्ति अग्निहोत्री व दीक्षित या नांवाने संबोधिल्या जात. तसेंच यांना काशी येथे कांहीं इनाम होते, असे पृष्ठ ३३२ वर लिहिले आहे. पेशवे दप्तरांत शक १७१६ तील उपलब्ध झालेल्या माहितीवरून अनंतभट (५) यास काशींत ५० रुपये वर्षासन मिळत होते असे आढळते (ऐ. क्र. ८४ पहा). अनंतदीक्षित हे काशीस होते. हे काशीहून गणेशभट गोडसे यांनी राघो बल्लाळ पेंडसे मु. पुणे यांस लिहिलेल्या पत्रावरूनहि ठरतें (ऐ. क्र. ८५ पहा). हे राघो बल्लाळ पेंडसे नाना फडणीस यांजकडे होते. - भिकाजी सदाशिव (४) यांस दहा पुत्र होते असे कळते. पूर्वी पांचांची माहिती उपलब्ध झाली होती. आतां आणखी दोघांची–अनंत व काशीनाथ यांची माहिती उपलब्ध झाली आहे. काशीनाथ श. १७७४ मध्ये पैठणास गेला असतां त्याने तेथे लेख दिला आहे तोः–काशीनाथभट पिते भिकंभट आजे सदाशिवभट बंधु दाजीभट व नारोपंत व बापूजीपंत व विसाजीपंत व गंगाधरपंत स्त्री उमाबाई. | श. १६५९ भाद्र. व. ११ या दिवशीं मौजे कोठंबे व दुसरे एक गांव पाा नसरापूर प्रांत कल्याण येथे ६२ ब्राह्मणांस ४६ बिघे जमीन श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे यांनीं इनाम दिली. त्यांत तीन पेंडसे होते. (१) बहिरंभट पेंडसे (२) नारंभट पेंडसे व (३) गोविंद पेंडसे (ऐ. क्र. ८० पहा). पूर्वी दिलेली सनद जीर्ण झाल्यामुळे श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी नवीन सनद श. १६७० मार्ग. शु. ८ रोजी करून दिली. त्यांत वरील तीन नांवे आहेत; यावरून हे तिघेही त्या वेळी जिवंत होते असे दिसते (ऐ. क्र. ८१ पहा). सुरु सन इहिदे सबैन मया व अलफ म्हणजे श. १६९२ मध्ये कोठिंबे गांवांत ब्राह्मणांस इनाम दिलेल्या जमीनीचे क्षेत्रफळ बिघे व आकार हीं दिली आहेत. त्यांत खालील तीन नांवें आहेत. (१) रामभट अग्निहोत्री (२) वासुदेवभट अग्निहोत्री व (३) नारायणभट अग्निहोत्री. येथे पेंडसेच्या ऐवजी अग्निहोत्री लिहिले आहे. २६ वे घराणे, उकसाण-वावशी, या घराण्यांतील मंडळीस अग्निहोत्री म्हणत असत. म्हणून हीं नांवें पडसे यांचीच आहेत यांत शंका नाही. यांमध्ये नारायणभट हे नांव पूर्वी आलेल्या नांवांपैकीच आहे. बहिरंभट व गोविंदभट हीं नांवें नाहींत व त्याऐवजी रामभट व वासुदेवभट हीं नवीन नांवे आहेत. यावरून बहिरंभटाचे व गोविंद भटाचे रामभट व वासुदेवभट संबंधी असावेत (ऐ. क्र. ८२ पहा). | श. १७४९ वैशाख व. ११ (स. १८२७ मे २१) या दिवशीं श्रीवर्धनचे आणि हरेश्वरचे २१ रहिवासी यांनी मुंबईचे गव्हर्नर यांना एक अर्ज करून जमिनीचा भोगवटा चालू ठेवण्याबद्दल विनंति केली (डोंगरेकुलवृत्तान्त पृ. २० व २१ पहा).