पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ पेंडसे कुलवृत्तान्त [ प्रकरण १२. ५.१.AA ५.tv

  • प्रभाकर विनायक (६) ज. स. १९२४ डिसें. १०. शिक्षण इंग्रजी ४ इयत्तेपर्यंत.

पुण्यास बिल्डिग, कॉन्ट्रेक्टरकडे काम करतात. वास्तव्य घर क्र. १४३ नारायण पेठ. घराणे २६ वें, उकसाण-वावशी खंड पहिला, पृष्ठ १४२-१४३ या घराण्याचा मूळ पुरुष बाळंभट मानिला होता. नाशिक येथील वे. पिंगळे यांजकडे उपलब्ध झालेल्या पुढे दिलेल्या लेखांवरून बाळंभटांच्या पूर्वीच्या दोन पिढ्यांचीं, म्हणजे बाळंभटाचे पिता व पितामह यांची नांवे कळली आहेत. तसेच पिढी ३ मध्ये केशव व त्यांचे मुलगे वासुदेव व गणेश इत्यादि दाखविले होते. त्यासंबंधानेहि जास्त माहिती उपलब्ध झाली आहे. या नवीन मिळालेल्या माहितीमुळे पूर्वी दिलेली वंशावळ दुरुस्त करून व वाढवून पुनः देत आहों. पिंगळे १७-३६ नारायण बाळं नारायण महादेव. पुत्र हरी माता द्वारकाश्रीवर्धन . पिंगळे १७-४९ रामभट केशव नारायण महादेव. चुलते बाळंभट, त्याचे पुत्र नारायणभट बं. त्र्यंबक भट व गणेश व कृष्ण. माता पार्वती-हरीहरेश्वर. • पिंगळे २२-१६ वासुदेव केशव नारायण महादेव. बं. त्र्यंबक व गणेश व कृष्ण पुतणे केशव व जगन्नाथ व नारायण व गोविंद--श्रीवर्धन. पिंगळे २४-३९ बाळाजी वासुदेव केशव नारायणः चुलत बं. बापूजी त्र्यंबक व गोविंद--श्रीवर्धन, पुणे. संशोधनक्रमांक १९ पृष्ठ ३६९ यांतील व्यक्ति या घराण्यांतील आहेत है। आतां निश्चित ठरले आहे. संशोधन क्रमांक २३, पृष्ठ ३७० मधील हरीदीक्षित, अनंतदीक्षित हे त्या क्रमांकांत सूचित केल्याप्रमाणे याच घराण्यांतील आहेत असे सिद्ध करण्यास पैठण येथील वे. कावळे यांजकडे दाजीभट (५) यांनी शक १७६७ मध्ये दिलेला लेख स्पष्ट आहे. त्यावरून हरीदीक्षित हे दाजीभटाच पुतणे आहेत. - वही. पान १०८–दाजीभट पेंडसे, पिते भिकंभट आजे सदाशिवपंत पुतण गोपाळपंत व हरीदीक्षित बिन अनंत दीक्षित हल्ली वस्ती काशी मंगळागौरी घाट-गांव वावशी. - हरीदीक्षित यांनी आपल्या आज्याचे नांव जयकृष्ण असे दिले आहे. " लेखांतील चूक असावी किंवा भिकाजी (४) यांचे दुसरे नांव कृष्ण असावे. या