पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ प्रकरण 'पॅडसे—कुलवृत्तान्त ५, १७८ । घराणे २४ वें, रोहें, खंड पहिला, पृष्ठ ३२९ या घराण्याचे कोंकणांतील मूळ गांव गोळप आहे असे निश्चित कळते. क्षेत्रोपाध्यायांकडे दिलेल्या लेखांत केशव (३) यांनी * शिरवली, महाड, गोळप," अशीं गांवें सांगितली आहेत. तसेच वासुदेव (४), गोविंद (४) व विठ्ठल (५) यांनी शिरवली, गोळप, असे सांगितले आहे. नाशिक-वा. दाते. ३०-१३ केशव कृष्ण रामभट पुत्र शिवराम व रामकृष्ण पुतणे आपाभट व हरभट व नारो गोपाळ चु. पुतणे वासुदेव व गोविंद. ... वरील लेखावरून शिवराम, रामकृष्ण, हरभट व गोविद हीं चार नांवें नवीन समजली. ती सोबतच्या वंशावळींत दाखविली आहेत. यांतील गोविंद हे यात्रेला गेल्याचा उल्लेखहि आढळला आहे. | नारायण रामचंद्र (६) यांचे कुटुंबांत कुलदेव श्रीदत्तात्रेय व कुलदेवी त्रिपूरसुंदरी अंबिका मानतात. शारदीय नवरात्रांत कलशावर आवाहन करून घट बसवणे व दररोज नवी चढतीमाळ व चढती श्रीसूक्ताभिषेकयुक्त पूजा करणः श्रीविद्याषोडशाक्षरी मंत्राचा जप, अखंड दीप, सकाळ संध्याकाळ पूजा व आरती रविवारी सुवासिनीस हळदकुंकू व भोजन व देवीची ओटी भरणे, असा आचार आह: दस-याचे दिवशीं नवरात्र उठते. घराण्यांत लग्न मुंज किंवा जनन झाल्यास बोड भरणेची चाल आहे. आश्विन शु. १५, वद्य १२, १४ व अमावास्या, कातक शु. १ शु. ११, शु. १४ व वद्य ११ या दिवशी पवमानअभिषेकयुक्त पूजा श्रीफळ व पूर्णठाव नैवेद्य असतो. मार्गशीर्ष शु. १३ ते १५ श्रीदत्ताचा उत्सव असता त्यांत, शु. १४ स त्रिकाळपूजा, प्रदोषकाळीं श्रीचा जन्मोत्सव व पवमानयुक्त पूजा असते. शु. १५ स श्रीस संपूर्णठाव नैवेद्य असून प्रसाद--समाराधना होते. पौष मकरसंक्रांतीनिमित्त श्रीफल व नैवेद्य देतात. माघ शु. १ ते ७ स श्रीगणपतिउत्स असतो. त्यांत शु. ४ स दुपारीं जन्मोत्सव (श्रीफळ देतात) व सप्तमीस पुरणपोळा नैवेद्य असतो. देवास पूर्णठाव नैवेद्य व श्रीफळ देतात. रात्रीं इच्छेप्रमाणे कथा, लळा वगैरे करणे. रोज पवमानयुक्त अभिषेक पूजा असते. महाशिवरात्रीस अभिः घवमानयुक्त करून दुसरे दिवशीं श्रीफळयुक्त महानैवेद्य देतात. फाल्गुन शु. । श्रीहनुमानजीच्या वाढदिवसानिमित्त अभिषेकयुक्त पूजा व श्रीफळयुक्त महान देणे. चैत्र शु. १ ते ९ पर्यंत श्रीरामपादुकांचा उत्सव. नवमीला श्रीफळयुक्त न व पवमानयुक्त : अभिषेकपूजा असते. शु. १४ स महालक्ष्मीच्या नांवा देवीसूक्तयुक्त अभिषेक व श्रीफलयुक्त महानैवेद्य. शु. १५ स श्रीहनमान–देवतेसाद अभिषेकयुक्त पूजा व श्रीफळनैवेद्य. वैशाखांत परशुराम-जयंतीस श्रीफळे दो क्षेत्राधिपति व कुलाधिपति म्हणून देऊन पवमानयुक्त अभिषेक, पूजा व महान ।