पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेंडसे कुलवृत्तान्त १७० { प्रकरण ००० झाल्यानंतर चार वर्षे मुंबई व उपनगर यांत निरनिराळ्या शाळांत शिक्षकाचा व्यवसाय केला. वरच्या वर्गांना इंग्रजी व संस्कृत शिकवीत. मुंबई उपनगरांत खार येथे आज भरभराटीस आलेले विद्यामंदिर हायस्कूल स्थापन करण्यांत | १ सौ. शरयूबाई २ शंकर केशव यांचा हात होता व त्या हायस्कूलचे पहिले प्रिन्सिपाल हे होते. त्या जागी असतांना शिक्षकाचा व्यवसाय कायमचा सोडून ग्रंथप्रकाशनाच्या व्यवसायात शिरले. एका ब्रिटिश ग्रंथप्रकाशक कंपनीचे प्रतिनिधि म्हणून पांच वर्ष हिंदुस्थानांत प्रवास केला. नंतर ती नोकरी सोडली आणि मुंबईच्या ‘लोकमान्य दैनिकाच्या संपादक मंडळावर गेले. तेथे हे काम करीत असतांना श्री. खेरांनी मंत्रिमंडळ स्थापन केले तेव्हां असेंब्लींतील काँग्रेस पक्षाचे हे सेक्रेटरी झाले. त्या जागेवर काम करीत असतां स्वतःचे वृत्तपत्र काढण्याचे ठरविले आणि मुंबईसच ‘राष्ट्रमत' साप्ताहिक जून १९४७ मध्ये सुरू केले. हल्ली मुंबईच्या 'लोकसत्ता दैनिकाचे आणि ‘रविवारची लोकसत्ता' या साप्ताहिकाचे हे मुख्य संपादक आहेत. यांच्याच संपादकत्वाखालीं एक सायंदैनिक सुरू होणार आहे. | काँग्रेस सेवादलाचे मुंबई उपनगरांतील जिल्हा अधिनायक आहेत. पालअंधेरी म्युनिसिपालिटीचे सभासद, काँग्रेस कमिट्यांत सभासद व सेक्रेटरी म्हणून काम केले आहे. ब-याच राजकीय, सामाजिक संस्थांशी संबंध. एकनिष्ठ गांधीभक्त. कट्टर गांधीवादी. काँग्रेसच्या विधायक कार्यक्रमांशीं निकटचा संबंध