पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें] वंशावळी व माहिती। १७१ an...//wwwwwwwvvv www शुद्धवर्तनाचे नीतिनियम हींच धर्मबंधने आणि माणुसकी हाच धर्म असा यांचा दृढ विश्वास आहे. लेखनगुण आणि वक्तृत्व लहानपणापासून नैसर्गिक आहेत. वास्तव्य सूर्यनिवास, राममंदिर रस्ता विलेपार्ले, मुंबई २४. भार्या शरयू, ज. विजापूर (गुजराथ) स. १९२० ऑक्टो. १३. वि. स. १९३९ एप्रि. ३०. पि. सदाशिव हरी लिमये, विलेपार्ले. शरयूबाईमध्ये आनुवंशिक गायनकला आहे. गांधर्व महाविद्यालयाची संगीतविशारद पदवीपरीक्षा उत्तीर्ण. चालू वर्षी इंडियन वुईमेन्स् युनिव्हर्सिटीच्या गृहितागमा पदवीपरीक्षेस बसणार आहेत. काँग्रेसच्या विधायक कार्यक्रमांत भाग घेतात. अखिल भारतीय महिला परिषद व इतर सामाजिक संस्थांशी संबंध. पतीच्या राष्ट्रमता'च्या सहसंपादिका होत्या. विठ्ठल त्र्यंबक (१०) मृ. श. १८६९. परशुराम विठ्ठल (११) भार्या अन्नपूर्णा (चंद्री), पि. विष्णु महेश्वर खरे, | पालगड. । आबाजी जगन्नाथ (६) भार्या लक्ष्मी. नरसो राम (५) हे सन १७८० च्या सुमारास असावे. दामोदर राम (५) हे सन १७८० च्या सुमारास असावे. बापूजी गंगाधर (६) श. १७४३ मध्ये बापूजी गंगाधर यांचा लेख काशींतील उपाध्ये चितळे यांजकडे आहे, तो यांचाच असावा. घराणे १९ वे, हेदवी खंड पहिला, पृष्ठ १३४ नारायण त्र्यंबक (७) लक्ष्मेश्वर, यांजकडून आलेली वंशावळ पहिल्या खंडाच्या पष्ठ १३४ वर दिली आहे. या घराण्यासंबंधीं क्षेत्रोपाध्यायांकडील लेख आम्हांस तेव्हां मिळाले नव्हते. आतां रामचंद्र गणेश (४) यांचा लेख मिळाला आहे तो असा :- दाते, नाशिक २-३२ आणि ३४-२२, रामचंद्र गणेश बल्लाळ गणेश बल्लाळ. पुत्र विष्णु, पुतणे नारो त्र्यंबक यांचे महादेव व गोविंद व पांडुरंग व गोपाळ. नातू गणेश व त्र्यंबक व केशव-हेदवी, साखरीआगर व गोळप, यावरून मूळ पुरुषाचे नांव पूर्वी महादेव दाखविले आहे त्या ऐवजी गणेश असावे व त्याच्या पित्याचे नांव बल्लाळ अंसावे. पुढीलप्रमाणे दुसरा एक लेखही मिळाला आहे. त्यावरून महादेवाच्या ऐवजी गणेश हें नांव असावे असे मानण्यास पुष्टि मिळते. हे अनुमान बरोबर आहे असे मानल्यास वंशावळ पुढीलप्रमाणे होईल. त्र्यंबकेश्वर- पिंगळे १२-४१ | गणेश कृष्ण गणेश बंधु नारायण पुत्र गोविद, हेदवी नरवण.