पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १६९

खंड पहिला, पृष्ठ ३१५ * मुरलीधर रामचंद्र (१२) ज. श. १८६९. महादेव अनंत (११) मृ. श. १८६५. * काशीनाथ महादेव (१२) ज. श. १८६०. * त्र्यंबक महादेव (१२) ज. श. १८६२. • केशव त्र्यंबक (१०) ज. गिम्हवणे स. १८५८ नोव्हें ८, मृ. स. १९१८ डिसें. १३. बडोद्यास अर्धागवाताने. निःस्पृह व सत्यंप्रिय. लहानपणीं अवघा एक रुपया वाटखर्चीसाठीं कनवठीस लावून मुंबईस आले. बी. बी. सी. आय्, जी. आय्. पी, जुनागड स्टेट इत्यादि रेल्वेत कारकून, सिग्नलरसारखी सामान्य कामें करून कर्तबगारीने वर चढत मोरवी स्टेट रेल्वेचे ट्रॅफिक् सुपरिंटेंडंट झाले. स. १९१८ त सेवानिवृत्त होऊन बडोद्यास राहाण्यास गेले. निष्ठावंत शिवभक्त. मुद्दाम गंडकीची शिळा आणून शिवलिंग तयार करवून मोरवीस आपल्या राहात्या सरकारी बंगल्याच्या आवारांत त्याची स्थापना केली व मंदिर बांधविलें. रोज स्वतः रुद्राभिषेक करीत. ते देवालय मोरवी दरबारने खास व्यवस्थेखाली ठेविले आहे. आचाराने कर्मठ पण सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत उदारमतवादी. निष्ठावंत टिळकभक्त. टिळकांच्या चळवळींतील लोक यांच्या घरी येत असल्यामुळे ब्रिटिश अधिका-यांमार्फत त्या वेळच्या मोरवीच्या ठाकूरसाहेबास सूचना गेली व त्यांनीं यांना ताकीद देण्याचा प्रयत्न केला; तेव्हां यांनी नोकरीचा राजीनामा दिला. तेव्हां ठाकूरसाहेबानी यांना मुद्दाम परत बोलावून राजीनामा परत दिला व पुढे सरकारी अधिकारी यांच्या वाटेस गेले नाहींत. संस्कृत वाङमयाचा खोल अभ्यास होता. गणिती होते आणि ज्योतिषशास्त्र, सायन, निरयन व पंचांगसंशोधन या वादांत यांनी 'केसरी'त बरेंच लेखन केले आहे. तसेच शिवजन्मतिथी निर्णयाच्या अनुषंगाने यांचा उल्लेख केळकरकृत • आहे. गोडबोले यांच्या इंग्रजी-मराठी कोशांतील ज्योतिषविषयक व गणितविषयक शब्द यांनी पुरविले. भार्या (२) लक्ष्मी (काशी), ज. स. १८७३, मृ. स. १९३३ नोव्हेंबर २९. कन्या (१) रंगू, ज. स. १८९४ मे २७, मृ. स. १९१५. भ्र. शिवराम हरी बापट, (२) गंगू, ज. स. १९०१ जाने ७. मृ. स. १९४६ जून २३. (३) सुंदर, ज. स. १९०३ फेब्रु. १२, म. स. १९२६ मे २८. भ. यशवंत दत्तात्रेय भिडे, बडोदे. सुंदराबाईंना संस्कृत चांगले येत होते. * शंकर केशव (११) मोर्वी, बडोदे, पुणे, मुंबई, अशा चार ठिकाणी शिक्षण झालें. एम्. ए., एल्एल्. बी. १९१८ त वडील वारल्यापासून अनेक अडचणी आल्या. नातेवाईकांच्या साहाय्याच्या अभावी नोकरी, शिकवण्या इत्यादि करीत शिक्षण पूर्ण केले. एक वर्ष अॅग्रिकल्चरल् कॉलेजमध्येहि होते. बी. ए.