पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१७) कर्तृत्वकारिणी स्त्रियांची अधिक माहिती द्या । याशिवाय कुलवृत्तान्तांत द्यावयाच्या माहिती संबंधानें कांहीं सूचना करून ही लांबलेली प्रस्तावना संपवू. कुलवृत्तान्तांत पुरुषांच्या प्रमाणेच स्त्रियांच्याहि कर्तृत्वाची व उल्लेखनीय गुणांची माहिती द्यावी. शिक्षणासंबंधी कोष्टके देतांना जशी मुलांची शेकडेवारी दिली आहे तशी मुलींचीहि शेकडेवारी द्यावी. पदवीधर स्त्रिया व स्वतंत्र व्यवसाय करणा-या स्त्रिया यांची नांवे देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचाहि तपशील द्यावा. त्याचप्रमाणे विद्यमान अविवाहित मुलगे व मुली यांची कुटुंबवार व गांववार माहिती द्यावी म्हणजे विवाहमंडळांचे कार्य सुलभ होईल. अविवाहित मुलगे २० ते ३० वयाच्या आतील आणि अविवाहित मुली १५ ते २५ वयाच्या दरम्यानच्या असतील तेवढी नांवे, त्यांचे शिक्षण व वसतिस्थान यांचा निर्देश करून वेगळ्या प्रकरणांत द्यावी. कौटुंबिक माहिती देतांना जन्म व मुत्यु यांची वर्षे कांहीं ठिकाणीं शकांत व कांहीं ठिकाणीं सनांत दिली आहेत. कांहीं ठिकाणी जन्माची नोंद शकांत करून विवाहाची नोंद इसवी सनांत केली आहे; अशी सरमिसळ घोटाळा उत्पन्न करते. यास्तव या संबंधांत एकच पद्धत सर्वत्र ठेवावी व या पुढे सर्व नोंदी शकांत असणेच इष्ट होय. येथन पुढे शिरगणतीत कोकणस्थ, देशस्थ, क-हाडे इत्यादि पोटजातींचा उल्लेख होणार नाहींच; या करितां प्रत्येक पोटजातीने आपली शिरगणति आपणच केली पाहिजे. या दृष्टीने यापुढे कुलवृत्तान्तच खानेसुमारीच्या पुस्तकांची जागा पटकावणार. ही भावी स्थिति ओळखून ज्यांनी आजवर हे कार्य हाती घेतले नाहीं त्यांनींहि ते कार्य हातीं घेऊन कुलवृत्तान्त प्रसिद्ध करावे. ज्या घराण्यांतील विद्यमान कत्र्या पुरुषांची संख्या ५०० हून कमी असेल त्यांनी समान गोत्रांतील इतर उपनांवांपैकी ज्या उपनांवाच्या व्यक्तींची भर आपल्या कुलवत्तान्तांत घालत घालून ग्रंथाची पष्ठसंख्या छपाईस सोयीची होईल अशा उपनांवांच्या माहितीचा समावेश करून वृत्तान्त तयार करावा. साधारणतः कोणताहि वृत्तान्त ५०० पानांहून लहान किंवा हजार पानांपेक्षा मोठा होऊ नये. या बेताने एकेका गोत्रांतील उपनांवें शोधून पाहून त्यांचे गट करून शक्य तोंवर कोणतेहि आडनांव सुटणार नाही अशी तजवीज करावी. जागृतीनंतरचे कार्य अशा प्रकारें कुलवृत्तान्त तयार झाले म्हणजे आपले कर्तव्य संपले असे मात्र मानं नये. कुलवृत्तान्ताचे कार्य हे ध्येय नसून आपले ध्येय गांठण्याचे ते एक साधन आहे. स्वकुलाची उन्नति व तद्वारा ब्राह्मण समाजाची आणि परंपरेने देशाची उन्नति हे आपले ध्येय आहे. ते ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शक नकाशा किंवा