पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१८) आराखडा एवढीच कुलवृत्तान्ताची योग्यता होय. घरबांधणीसाठी नकाशा तयार केला म्हणजे जसे कार्य संपत नाहीं याप्रमाणे कुलवृत्तान्त प्रसिद्ध केल्याने कार्य संपत नाहीं. हा नुसता कायांचा प्रारंभ आहे. कुलपुरुषाची झोंप संपून तो जागृत झाल्याचे ते चिन्ह आहे. जागृतीनंतरचे कार्य या पुढेच आहे. त्यासाठी कुल संघ स्थापून त्या संघामार्फत कुलांतील प्रत्येक कुटुंबांतील अडीअडचणींचा विचार केला जावा. आपल्या कुलांतील कोण कोठे आहे. व त्याचे कार्य काय व कसे चालले आहे यावर कुल-संघाची नजर असावी. त्या योगाने व्यक्तीला आपल्या वरच्या जबाबदारीची जाणीव होते आणि आपल्या दुष्कृत्याने आपल्या कुल बांधवांस कमीपणा न येऊ देण्याची तो दक्षता घेऊ लागतो. याचप्रमाणे संकटप्रसंगी आपल्या कुलबांधवांचा आपल्यास आधार मिळेल अशी आशा वाटून त्या आधारावर भरंवसा ठेवून तो आपलें धैर्य खचू देत नाही. अशा रीतीने ‘एकमेका करू साहाय्य । अवघे धरू सुपंथ' हे ध्येय गांठणे हीच कुलवृत्तान्ताच्या खटाटोपाची सार्थकता होय. अखेरीस । भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः ।। भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।। स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिः ।। व्यशेम देवहितं यदायुः ।।। अशी प्रार्थना करून हे विवेचन संपवितों. ५६८ नारायण पेठ, गायकवाड वाडा, पुणे. फाल्गुन शुद्ध ९ शके १८७० जनार्दन सखाराम करंदीकर । ।