पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

: ६ वें ] वंशावळी व माहिती . १६३

मृ. स. १९४५. महात्मे यांजकडील. वि. स. १९४४. कन्या जयश्री, ज. स. १९४४. भार्या (३) उर्मिला, पि. गोखले, मणचें. वि. स. १९४७. * विलासचंद्र विश्वनाथ (८) ज. मुंबई स. १९४२. * गोविंद मोरेश्वर ऊर्फ आप्पा (७) सहसंपादक विविधवृत्त, सिरॅमिक् अॅन्ड ग्लास इन्डस्ट्रीज, बडोदे, व इन्डस्ट्रिअल प्रमोटर्स, बडोदे या कंपन्यांचे मॅनेजिंग डिरेक्टर, जी. मोरेश्वर अॅन्ड कंपनी, कापडाचे व्यापारी याचे भागीदार, मुंबई मराठी साहित्य संघाचे एक उत्पादक व कार्यकारी सभासद, संमेलनाचे कार्यवाह, मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यकारी मंडळाचे सभासद, मुंबईस भरलेल्या परिषदेचे कार्यवाह, मराठी पत्रकार परिषदेच्या स्थायी समितीचे सभासद. नाट्यमहोत्सवाच्या कार्यकारी मंडळाचे सभासद व शाखा कार्यवाह, हौशी नट, टीकाकार, लेखक, रेडिओ टीकाकार व प्रवक्ते, चूल आणि मूल बोलपटांतील प्रमुख भूमिका नायक, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यकारिणी सभेचे सदस्य, रायटर्स, जर्नॅलिस्ट अॅन्ड आर्टिस्ट असोशियनचे, झुणकाभाकर आश्रम–अ. वि. गृह सांताक्रूझच्या कार्यकारी मंडळाचे सभासद आहेत. वास्तव्य मोती मॅन्शन खेतवाडी, मेनरोड मुंबई ४. भार्या नंदिनी (लीला), बी. ए. पि. केशव वासुदेव कामत, मुंबई. वि. स. १९४१. कन्या (१) प्रतिभा ज. स. १९४४ (२) वसुंधरा, ज. स. १९४६. भास्कर चिंतामणि (६) बडोद्यास अन्योन्य सहकारी मंडळींत नोकर होते. भार्या पि. काशीनाथ माधव मोडक, बोरसद. भालचंद्र भास्कर (७) मृ. स. १९४३. * विनायक भास्कर (७) दादर येथे असतात. सीताराम रघुनाथ (५) भार्या गोपिका. गजानन सीताराम (६) भार्या सरस्वती. नीलकंठ रघुनाथ (५) भार्या गंगा. * आत्माराम नीलकंठ (६) भार्या रखमा. * त्र्यंबक आत्माराम (७) भार्या इंदिरा (काशी), ज. स. १८४१. पि. सखाराम गणेश लेले, कवाड. वि. श. १८६२. काशीनाथ यादव (४) भार्या गंगा. बाळाजी काशीनाथ (५) यांचे नांव सदाशिव होते. चिमणाजी काशीनाथ (५) यांचे नांव शंकर होते. खंड पहिला, पृष्ठ ३०९ * रामचंद्र केशव (७) वास्तव्य सिद्धपुरा बिल्डिग, १५/१६ उत्तर भाग, एच् ब्लॉक दादर, मुंबई १४. भार्या जानकी (सीता) ज. श. १८२६ पि. काशीनाथ रामचंद्र लेले. वि. श. १८४५.