पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५) प्राण्याला कांहीं आत्मीयता आहे. स्वकुलाभिमान आहे, त्या कुलाच्या आचारविचारांविषयी आदर आहे, पूर्वजाविषयी प्रेम आहे आणि आपले कुल आपलेपणा न सोडतां सतत टिकावे अशी उत्कट इच्छाहि मनुष्यमात्राच्या ठिकाणी असते. याकरितां स्वधर्म, स्वकुलाचार, देवऋण, पितृऋण, समाजऋण जाणण्याविषयीची नैसर्गिक तत्परता त्याच्या अंगी असते. या सर्व भावनांचे पोषण आणि संवर्धन करण्याकरिता प्रत्येक कुलाने कुलोपाध्याय टिकविले पाहिजेत व त्याकरिता त्यांचा योगक्षेम चालविला पाहिजे. म्हणून प्रत्येक कुलाने आपल्यांतील उपाध्याय वर्गाच्या योगक्षेमाची जबाबदारी स्वतःवर घेतली पाहिजे आणि त्या उपाध्याय वर्गाने कुलाचे धार्मिक आचारविचार, कुलधर्म, संस्कृति यांचे शिक्षण प्रत्येक पिढीला देत राहिले पाहिजे. नवीन राजवटींत आणि सध्यांच्या समाजकारणाच्या गोंधळांत हैं। शिक्षणाचे कार्य सरकाराकडून होऊ शकणार नाही. यास्तव धर्म शिक्षणाचे कार्य प्रत्येक कुलाने आपल्यापुरते आपणच सांभाळले पाहिजे. आपापल्या कुलापुरताच वरील विचार मर्यादित आहे असे नसून ब्राह्मण वर्गातील सर्व कुलांनाच तो लागू आहे. वर्गविहीन समाज स्थापण्याचा आपला विचार राजकीय पुढा-यांनी कितीहि अट्टाहासाने प्रतिपादिला तरी समाजांत या ना त्या रूपाने चातुर्वर्ण्य हें राहणारच आणि ते जर टिकणारच तर त्यांतील ब्राह्मण्यरक्षणाचे आणि इतर वर्णाचे गुरुत्व करून त्यांना धर्मशिक्षण देण्याचे कार्य ब्राह्मण बगलाच करावे लागणार. तेव्हा आपल्यावर आलेली ही नैसर्गिक जबाबदारी, आपला हा सहजधर्म, न डावलत, आपण स्वकर्तव्य निष्ठापूर्वक पाळण्याचा व ते कर्तव्य पार पाडण्याची पात्रता अंगीं राखण्याकरितां स्वतः धर्म व संस्कृति यांचे ज्ञान संपादन करून ते इतर वर्णात संक्रमित करण्याचा प्रयत्न ब्राह्मणवर्गाने केला पाहिजे. आजच्या राजकीय पुढा-यांची दिशाभूल कशी होत आहे याचे प्रत्यंतर पटप्रयाला फारसे खोलांत शिरावयाला नको. आपल्या देशांतील सार्वजनिक व्यवहारांत सत्यनिष्ठा आणि नीतिमत्ता राहिली नाही म्हणून जो तो पुढारी रडगाणे गात आहे. परंतु धर्मनिष्ठेवांचून सत्यनिष्ठा व नीतिमत्ता अंगांत कशी बिबणार ? धर्माचे नांव वावडे मानून धर्माचे फल अशी जी नीतिमूल्ये त्यांची मात्र हे पुढारी अपेक्षा करीत आहेत. ‘पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवाः। पापस्येच्छन्ति न फलं पापं कुर्वन्ति नित्यशः' अशी या पुढा-यांची अनुकंपनीय स्थिति झाली आहे. धर्म नको पण धर्माचे फल मात्र पाहिजे. आंब्याचे झाड लावण्याची खटपट करावयास नको आंबा मात्र चाखावयास पाहिजे, असली विपरीत वृत्ति दीर्घ काल टिकू शकणार ना आणि समाजांतील बजबजपुरी दूर करण्याकरितां पुनश्च धर्माची कास धरावीच