पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४) जोडधंदा म्हणून करता येण्यासारखा आहे. फलज्योतिष व हस्तसामुद्रिक हेहि सद्यः फलदायी असे धंदे असून ब्राह्मणांना इतर कोणत्याहि व्यवसायाला पुष्टि देण्यासाठी ते धंदे करता येण्यासारखे आहेत. सारांश, चिकित्सक बुद्धीने डोळे उघडे ठेवून आणि निराशेच्या स्वाधीन न होता ब्राह्मणवर्ग उत्साहाने व निरलसपणाने व्यवसायांत पडू इच्छील तर त्याला इतके स्वतंत्र मार्ग मोकळे आहेत की, त्या मार्गात त्याला इतर वर्गाशी फारशी स्पर्धा करावी लागणार नाहीं आणि काय करावें सरकार आतां ब्राह्मणांना नोक-या देत नाहीं' असे म्हणून हताश होऊन बसण्याचा प्रसंग येणार नाही. मात्र दिवसाच्या ६० घटिकांतून एक घटकाहि अध्ययन किंवा अध्यापन केल्यावाचून त्याने व्यर्थ दवडता कामा नये. सांप्रतच्या समाज सुधारणेच्या काळांत किती तरी धंदे नित्य नवे निघत आहेत आणि ते डोळे दिपविण्याइतके किफायतशीरहि आहेत. असे असतां त्यांतील ए काहि धंद्याचा उल्लेख न करितां अल्पलाभाचे व जुने म्हणूनच हीन मानलेल्या व्यवसायांचाच उल्लेख कां केला व त्यावरच एवढा भर कां अशी पृच्छा कोणी करील तर त्यास उत्तर उघड आहे. ब्राह्मणांची विशिष्ट राहणी व संस्कृति यांना सांभाळूनच आपल्याला जगावयाचे आहे. जगण्यासाठी व जगण्यापुरती द्रव्यप्राप्ति झाली पाहिजे हे खरे असून द्रव्यप्राप्तीसाठी जगावयाचे नाही. अर्थातच ब्राह्मण्याचा लोप न होतां, किंबहुना ब्राह्मण्याचे तेज वृद्धिंगत करून कसे जगावयाचे याचा विचार आपल्यापुढे आहे. ब्राह्मण्याचा लोप करून कितीहि भरभराटींत राहतां आलें तरी त्या राहणीला, प्राण निघून गेलेल्या कुडीइतकीच किंमत देतां येईल; यास्तव लुप्त होऊ लागलेल्या ब्राह्मण्यपोषक धंद्यांचा उल्लेख मुद्दाम केला आहे. बाकी नवे आधुनिक धंदे चित्ताकर्षक व वित्तदायी असल्याने त्यांची शिफारस न करतांहि तिकडे प्रवृत्ति चालू आहेच. धर्मशिक्षणाचे कार्य आज आपण जे कुलवृत्तान्त प्रसिद्ध करीत आहों ते त्या त्या कुलाच्या अभिमानानेच ना ? प्रत्येक कुलाला आपल्या कुलाचे कांहीं वैशिष्ट्य आणि कांहीं परंपरा याचा अभिमान आहे म्हणूनच इतके परिश्रम आणि इतका द्रव्यवेच चालला आहेना? पण समजा, आणखी वीस पंचवीस वर्षांनी पेंडसे कुलांतल्या एकाहि व्यक्तीला आपण भृगु कुलांतले, जामदग्न्य गोत्री, ऋग्वेदांतील शाकल शाखेचे व आश्वलायन सूत्राचे आणि आपले कुलदैवत अमुक या पैकी कशाचीच आठवण नाहींशी झाली तर त्या व्यक्तींचा समावेश कोणत्या कुलवृत्तान्तांत करावयाचा ? आजचीं पेंडसे कुलांतील नांवे खरे कुलवृत्तान्तांत, खरे कुलवृत्तान्तांतील नांवें परांजपे कुलवृत्तान्तांत, परांजप्याची नांवें लिमये वृत्तान्तांत आणि लिमये गोळे कुलांत समाविष्ट केले तरी ते कोणाला उमगणार ? आणि अशा परिस्थितीत कुलवृत्तान्त प्रसिद्ध करण्याचा उपद्व्याप तरी कशा करितां करावयाचा ? मनुष्य