पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३) रोगांच्या साथी ज्या प्रमाणे आल्या म्हणजे कांहीं काळ राहतात व नंतर ओसरतात त्याप्रमाणे अत्याचारांच्या प्रवृत्तीचीहि एक मानसिक साथ आली होती. ती साथ कालान्तराने ओसरत आहे. मात्र रोगाची साथ ओसरली तरी तिचा प्रादुर्भाव पुनश्च होऊ नये म्हणून आपण घरांची व गांवाची साफसफाई करतो त्याप्रमाणे ब्राह्मणेतरांच्या अत्याचाराची साथ पुनश्च प्रादुर्भूत होऊ नये म्हणून ब्राह्मणांनी आपली राहणी व इतरांशी होणारी वागणूक साफसूफ करून शुद्ध राखावी. ब्राह्मण वर्ग हा धडा नीट गिरवील तर त्यास शहरांतल्या वातावरणापेक्षा खेड्यांतील वातावरणच आपल्या संस्कृतीच्या व धर्माच्या पालनाला अधिक अनुकूल असते असा अनुभव येईल. | हिंदी पुराणीक व कीर्तनकार ब्राह्मणांतील कीर्तनकार आणि पुराणीक यांच्या व्यवसायाचा समावेश कोणत्या कोष्टकांत केला आहे ते कळत नाही. कोणत्याहि कुलवृत्तान्तांत त्यांचा स्वतं उल्लेख आढळत नाही. पण हा व्यवसाय इतका उपेक्षणीय नाहीं. भिक्षुकीच्या प्राप्तीत भर टाकण्यासाठी इतर कोणताहि जोडधंदा शोधण्यापेक्षां कीर्तन अथवा प्रवचन करण्याचे शिक्षण घेऊन तो व्यवसाय करू लागल्यास भिक्षुकीशी त्याचा मेळ . उत्तम बसेल आणि तो धंदा मानाचा असून निर्वाहापुरती प्राप्ति करून देण्याइतपत फायदेशीर आहे. त्यांतून आतां हिंदी ही राष्ट्रभाषा झाली असल्याने हिदींतून प्रवचन व कीर्तन करणा-यास सगळा हिंदुस्थान देश मोकळा आहे. याशिवाय धार्मिक शिक्षणाचे आणि संस्कृत शिक्षणाचेहि वर्ग चालविणे लाभदायक होईल. भिक्षुकवर्ग संस्कृतचें अध्ययन मुळीच करीत नाही त्यामुळे त्याचे मंत्रपठण अर्थहीन बडबडी सारखे वाटते व त्यामुळे लोकांची श्रद्धा उडते. त्याऐवजी भिक्षुक जर संस्कृत जाणता असेल तर त्याची छाप समाजावर अधिक बसेल. मात्र त्याकरिता त्याला आधुनिक परिस्थितीचे व विचारप्रवाहांचेंहि ज्ञान असले पाहिजे. सारांश, भिक्षक जर चाणाक्ष आणि देशकाल वर्तमान जाणणारा असेल तर त्याला आपल्या व्यवसायाला तेजी आणतां येईल. व्यवसायांच्या यादींत सर्वच कुलवृत्तान्तांतून डॉक्टर व वैद्य हे एकत्र गणले गेले आहेत. औषधोपचार करणे एवढा एकच हेतु उभय सामान्य असला तरी डॉक्टरी व वैद्यकी, यांत सोम्यापेक्षां विरोधच अधिक आहे. पाश्चात्य डॉक्टरीचे शिक्षण अतिशय महाग आणि अत्यंत परिश्रमाचे असे आहे आणि तो धंदा करण्याला भांडवल पुष्कळच लागते. वैद्यकीचे शिक्षण त्या मानाने सुलभ आणि कमी खर्चाचे असून धंदा करण्याच्या सुरुवातीसच मोठे भांडवल त्यांत गुंतविलें पाहिजे असे नाही. शिवाय वैद्य आपला धंदा खेड्यापाड्यांत चालवू शकतो; कांना खेड्यांत जाणे परवडत नाही. शिवाय वैद्यकीचा धंदा हा भिक्षकीला,