पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण

  • माधव (रावसाहेब) सदाशिव (१०) बी. कॉम्. हायर डिप्लोमा इन् को

ऑपरेशन मिळविला आहे. * यशवंत सदाशिव (१०) मॅट्रिक. दिल्लीस इंडिअन नॅशनल एअरवेज लि. मध्ये एरोप्लेन इंजिनिअरचे शिक्षण चालू. अण्णाजी माधव (८) पुण्यास शनवार क्र. ५७७ (सध्यांचा क्र. ६८६ बुधवार पेठ) येथे छापखाना होता. घराणे १४ वें, मेटे . खंड पहिला, पृष्ठ २५३ सु. स. ११२२ जमादिलाखर छ २५ रोजी कार्ले यांचे देश कुळकर्णा संबंधाचे निवाडपत्र आहे. त्यांत “नारायणभट पेंडसे पंडित वस्ती कसबे खेड यांनी आपले नांव स्वाक्षरे लिहीलें असे' असा उल्लेख आहे. (पे. द. जमाव रुमाल ४८०). श. १६९० फाल्गुन व. १३ वे. नारंभट पेंडसे वस्ती खेड ताा सुवर्णदुर्ग यास... सालीना गवत पुळे २००० व पेढे २०० पावत असल्याचा उल्लेख आहे. किल्ले महिपतगड येथील हिशेबांत सु. स. १२०९ श. १७३० मध्ये धर्मादाव खालील व्यक्तीस दिल्याचा उल्लेख आहे. रु. ४ नारायणभट पेंडसे वास्तव्य कसबे खेड भात -- चिंतामणभट पेंडसे वास्तव्य मेटे परशरामभट पेंडसे वास्तव्य खेड. भिकंभट पेंडसे वास्तव्य खेड. नक्त रु. ५ नरसीभट पेंडसे (पे. द. रुमाल ६२५). पिंगळे व रटाटे यांचे सात्वीण गांवचे खोतीचे वादांत " रामभट पेंडसे उपाध्ये धर्माधिकारी खोपी बंदर वगैरे गाव अशी साक्ष आहे. सु. स. इसने तीसैन मया व अलफ सवाल छ १२. तारळेकर महाडिक यांनी श. १६१९ मध्ये महादेवभट व बाळकृष्णभट पेंडसेपुरोहित यांस वर्षासन रुपये १२ व बालकृष्णभट यांस जमीन इनाम दिली. (ऐ. क्र. ७६ नि ७७ पहा). उपलब्ध वंशावळींतील महादेव बाळंभट (३) हे कदाचित् वर उल्लेख केलेले महादेवभट असतील. बाळकृष्णभटाचे नांव वंशावळींत उपलब्ध नाहीं. संशोधन क्रमांक ५३ पहा. चितामणि रामभट (५) सु. स. ११९४ छ २४ सवाल अवल सालचे सुभा प्रांत महिमतगडचे हिशोबांत यास भात : बारुळे मापे व नक्त रुपया १ मिळून रु २॥॥॥ दिल्याचा दाखला आहे. (पे. द. जमाव रुमाल ५०२).