पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १२७ गणेश कृष्ण (४) हे इ. स. १७६३ चे सुमारास मृत्यु पावले असावेत. यांस खरगोण व बोड प्रांतीं आसामी रु. २०० ची श. १६७६ मध्ये व दसकुरई ऊर्फ हवेली अमदाबाद येथे आसामी रु. २०० ची श. १६७७ मध्ये मिळाली. तसेच राजपुरी प्रांतीं पांच खंडी तांदूळ श. १६७७ मध्ये देवविले. (ऐ. क्र. ५६, ५७, ५८ पहा). कल्याण सुभ्याचे कागदांत यांचा उल्लेख दफ्तरदार म्हणून आला आहे. कृष्णाजी गणेश (५) हे माघ व. ३ श. १७११ या दिवशीं मृत्यु पावले. यांस तात्या पेंडसे म्हणत. (काव्येतिहाससंग्रह, पत्रे यादी वगैरे. द्वितीयावृत्ती पृ. ४७१ ले. । ४९० -४९२). यांस मिळणा-या आसाम्यांची यादी उपलब्ध झाली आहे त्यावरून यांस ब-याच आसाम्या व इनाम होते. यांसहि दफ्तरदार हाच हुद्दा होता. प्रकरण ४ ऐ. क्र. १५ अ पृ. ४३-४४. यांत तात्या पेंडसे म्हणून ज्यांचा उल्लेख केला आहे ते हेच होत. हे नाना फडणीसांच्या विश्वासांतील गृहस्थ होते. (ऐ. क्र. ५९ ते ६६ पहा.) मौजे कांगू (कांगवई) येथील खोती चालविण्याची सनद यांस सु. सन अरवा सीतेन मया व अलफ मास जिल्काद मध्ये मिळाल्याचा दाखला आढळतो. गणेश कृष्ण ऊर्फ रावजी (६) पंचनदी ता. दापोली येथे स. १८६२-६३ पर्यंत रावजी कृष्ण पेंडसे या नांवानें खाते होते. त्या जमिनीचे वहिवाटदार मोडक व मनोहर होते. पुढे हे खाते मोडक यांच्या खात्यांत सामील झालें. अद्यापपर्यंत पंचनदीतील कांहीं ठिकाणांस पेंडसे यांची ठिकाणे म्हणतात. हे घराणे व घराणे नं २० वणोशी एक असण्याचा संभव पूर्वी व्यक्त केला आहे. त्यास या माहितीने बळकटी येते. (ऐ. क्र. ६७ ते ७१ पहा.) भार्या, मृत्यु शक १७६६. (धार येथील पवारांचे पत्रावरून) । खंड पहिला, पृष्ठ २५१ । * सदाशिव (बळवंत) कृष्ण (९) यांचे रूढ नांव बाळासाहेब आहे. दि पूना इन्व्हेस्टर्स लि. चे व सिव्हिल इंजिनिअर्स स्टोअरचे डायरेक्टर आहेत. पुणे मर्चन्टस को. बँकेचे ५ वर्षे डायरेक्टर व ३ वर्षे ऑनररी एजंट होते. स. १९४८ जाने. ३१ ला म. गांधीवधानंतर पुणे येथे झालेल्या दंगलीमध्ये यांचे लक्ष्मी रस्त्यावरील पेंडसे अँन्ड सन्स या नांवाचे खेळाच्या सामानाचे असलेलें दुकान जाळले गेले. आतां हें दुकान स्वतःच्या राहत्या घरी (६८६ बधवार पेठ) चालू आहे. दापोली तालुक्यांतील कांगवई गांवीं शती व बागायत आहे. तेथे कलमी आंब्याची झाडे लाविली आहेत. कन्या (३) शकुंतला, भ्र. खंडेराव दत्तात्रेय जोशी इंजिनिअर, असनसोल. (४) माणिक, बी. ए, भ्र. ले. कर्नल सूर्यकांत सदाशिव पंडित, नागपूर. (५), कुसुम (निर्मला), भ्र. मधुकर विनायक टिळक, वावशी.