पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'१२६ पेंडसे-कुलवृत्तान्त [ प्रकरण सटफाईड स्कूलचे डेप्युटी सुपरिन्टेन्डेन्ट. पगार रु. १२५. भार्या कमला, वयं ३१, पि. जनार्दन हरी मोने, गोरेगांव. खंड पहिला, पृष्ठ २४८ ।। * वसंत वासुदेव (९) ज. स. १९३२ जून १६. इंग्रजी पांचवींत. * श्रीनिवास वासुदेव (९) ज. स. १९४६ जुलै १९. शंकर दामोदर (८) मृत्यु नवव्या वर्षी. दत्तात्रेय दामोदर (८) मृ. स. १९३७ जून १६.. वय २५. रघुनाथ महादेव (५) नानाफडणीसांचे विश्वासांतील कारकून राघोपंत ते हेच असावेत असा तर्क केला होता; परंतु ते हे नव्हत. ते राघो बल्लाळ होत. (ऐ. क्र ८५ पहा). गोविद रघुनाथ (६) चौक येथे रहात. कन्या आनंदी, भ्र. कृष्णाजी (बगाजी) विश्वनाथ जोशी, पेण. महादेव गोविंद (७) मृ. स. १९०१, वय ७०. चौक येथे राहात. कन्या चिनकी (रखमाई), भ्र. रामचंद्र वासुदेव सोमण, मोहोपाडा. भिकाजी महादेव (८) विसाजी रघुनाथ लेले यांच्या पांडवकालावरील कै. शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे आक्षेप' या नांवाचे २५ पृष्ठांचे पुस्तक स. १९०१ मध्ये यांनी प्रसिद्ध केले. भार्या पार्वती (मनू), पि. विश्वनाथ सखाराम मराठे. कन्या येसू (उमा ऊर्फ इंदिरा), ज. स. १९०१. भ्र. गंगाधर, विनायक टिळक, कोल्हापूर. वि. स. १९२०. * मुकुंद भिकाजी (९) ज. श. १८१९ कातिक व. ९. वेस्टर्न इन्डिया थिएटर्स या कंपनीमध्ये नोकरी आहे. वास्तव्य ८५३ सदाशिव पेठ, खाडिलकर वाडा पुणे. भार्या सत्यभामा (कमळा), ज. स. १९१०; मृ. स. १९३७. वि. स. १९२७. कन्या (१) शांता, एफ्. वाय. भ्र. मधुसूदन गंगाधर केळकर, नागपूर. वि. स. १९४८. * वसंत मुकुंद (१०) मॅट्रिकचे वर्गात. * गोविंद मुकुंद (१०) इंग्रजी सहावत. * रामचंद्र पुरुषोत्तम (९) भार्या अन्नपूर्णा (काशी), पि विष्णु मोरेश्वर मराठे. खंड पहिला, पृष्ठ २४९ पुरुषोत्तम लक्ष्मण (६) नाना फडणवीस यांच्या पत्नी जीऊबाई यांच्यातर्फे पुण्यास राहून पुरुषोत्तम लक्ष्मण पेंडसे या नांवाचे गृहस्थ व्यवहार पाहात. पारसनीस संग्रहांत त्यांचीं कांहीं पत्रे आहेत. त्यांतील बरीच पुण्याहून मेणवलीस पाठविलेली आहेत. पत्रांचा काल साधारणतः श. १७२८ ते श. १७४३ चा आहे व त्यांत त्यांचे टोपणनांव भाऊ असे आढळते. ते पुरुषोत्तम लक्ष्मण हेच असावेत.