पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११) ही परक्यांची सेवा म्हणून ज्या प्रमाणे कित्येकजण नोकरी पत्करावयाची नाहीं असा निश्चय करीत, तसा निश्चय करण्याचे यापुढे कारण नाहीं. स्वतंत्र धंद्यांत पडावयाचे झाले तरी त्यांत ग्राह्याग्राहयतेचा विवेक करावाच लागणार. ब्राह्मणांतील पुष्कळसे तथाकथित स्वतंत्र धंदेवाले नोकरीवाल्यांपेक्षा अधिक परतंत्र असतात; याचे कारण धंद्यांत स्वतंत्रपणाचे उच्चस्थान मिळविणे भांडवलाच्या अभावीं ब्राह्मणांना दुष्कर आहे. स्वतंत्र धंदा करणा-यांतले पुष्कळसे लोक भांडवलासाठींतरी परावलंबी असतात. नाहींतर मालासाठीं तरी घाऊक दुकानदारावर अवलंबून असतात. त्यांचा व्यापार म्हणजे एक प्रकारची दलालीच असते, पण दलालांच्यापेक्षां यांना तोशीस मात्र ज्यास्त पडते. यास्तव ब्राह्मण धंदेवाल्यांनी आपलें हें परावलंबन कसें नाहींसे होईल याचा यापुढे विचार केला पाहिजे. भवानी पेठ, नाना पेठ किंवा मंडई येथून दलालामार्फत माल खरेदी करून आपल्या आळींत एखादे छोटेसे दुकान मांडून बसणा-यांची गणना व्यापारी या सदरांत करता कामा नये. स्वत:च्या कल्पनेने कांहीं एखादी नवी चीज तयार करून ती खपविणारा अथवा मालाचे उत्पादन जेथे होते अशा क्षेत्रांतून मालाची खरेदी करून तिची घाऊक विक्री करणारा तोच व्यापारी होय. अर्थातच यापुढे ब्राह्मणांनी नोकरीकडील लक्ष वळवून ते व्यापाराकडे वळवावयाचे म्हटल्यास ज्यांत परावलंबन नसेल अशा व्यापाराचे क्षेत्र पाहून त्यांत पदार्पण केले पाहिजे. नोकरीच करावयाची झाल्यास खासगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरी अधिक बरी. खासगी नोकरीतहि दोन प्रकार असू शकतात, एका नोकरीत नोकर अखेरपर्यंत नोकरच राहतो. असली नोकरी सर्वांत हीन दर्जाची. परंतु दुसरा एक नोकरीचा श्रेष्ठ दर्जाचा प्रकार असू शकतो. त्या नोकरीला उमेदवारी असे म्हणता येईल, अशी उमेदवारी करून धंद्यांतील खाचा खोचा व मर्म समजून घेऊन स्वतःचा धंदा उभारता यावा, अशा दृष्टीने अशा प्रकारची नोकरी करणें हें दूषणास्पद नसून भूषणास्पद आहे; कारण त्यांत भावी उत्कर्षाचे बोज असते. तेव्हां कोणताहि धंदा, व्यवसाय, अथवा नोकरी करावयास लागण्यापूर्वी त्या धंद्याचे, व्यवसायाचें अगर नोकरीचे पर्यवसान काय तें हेरून त्या दृष्टीने निवडानिवड करावी. या संबंधात खरे कुलवृत्तान्तांत उपयुक्त सूचना केल्या आहेत त्या लक्षात घेण्यासारख्या आहेत. | भिक्षुकी व धर्मगुरुत्व भिक्षुकी हा धंदा आतां नीट चालत नाही असे मानून तो धंदा सोडून देण्याकडे जी प्रवृत्ति वाढत आहे ती दुहेरी नुकसानकारक आहे. एकतर आपल्या हक्काचा एक व्यवसाय आपण होऊन सोडून देण्यांत स्वतःचे नुकसान स्वतः करून घेतो; आणि ज्यांना वेदोक्त संस्कार व इतर धर्मकृत्ये करण्याची हौस आहे त्यांना