पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०) शिक्षण मात्र घरची सुस्थिती असल्याविना पूर्ण करता येत नाहीं. उच्च शिक्षण तर श्रीमंतांनाच शक्य आहे. तेव्हां ज्या कुळांत प्राथमिक व हायस्कूल शिक्षण आणि हायस्कूल व उच्चशिक्षण यांत पुष्कळच घट दिसून येईल तेथे सांपत्तिक स्थितीची प्रतिकूलता अनुमानतां येते. पेंडसे कुलांत हे आंकड़े अनुक्रमे ३६, २७ व ६ असे आहेत. थत्ते ३७, २५, ८, गोळे २८, ४२, ७, चितळे ३१, २९, ९, मराठे ३८, २९, ६, असे त्या त्या कुलांतील आंकडे आहेत. यावरून कुलाकुलांत कांहीं फारसा फरक दिसून येत नाहीं. सरसकट गुडघाभर पाणी असा प्रकार दिसतो. त्यांतल्या त्यांत गोळे कुटुंबातील हायस्कुलांतील विद्याथ्र्यांची शेकडेवारी नजरेत भरण्यासारखी आहे. कोंकणस्थांचा उच्चशिक्षणाकडे ओढा जास्त आहे असे म्हटले जाते. परंतु वरील आंकडे पाहतां हायस्कुलांतील शिक्षण घेणा-यांपैकी निम्मे देखील विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे जात नाहीत असेच दिसून येईल. आर्थिक दुःस्थिति हेच याचे कारण असावे. । व्यवसायांची शेंकडेवारी पाहिल्यास त्यांत शेकडा ५० टक्के नोकरीत गुंतलेले आढळतात. नोकरीच्या बाबतींत परांजपे आणि थत्ते यांची शेकडेवारी ५४ व ५५ अशी अनुक्रमे असून ती इतर कोणत्याहि कुलापेक्षा अधिक आहे. शेती करणा-या परांजप्यांचा क्रम अगदी शेवटचा लागतो. अवघे शेकडा ५ परांजपे शेती करतात तर त्याच्या उलट मोने घराण्यांत शेती करणान्यांचे प्रमाण शेकडा २९ आहे. पेंडसे कुलांतील हा आंकडा २२ म्हणजे बताचा आहे. स्वतंत्र धंद्यांत परांजपे हे शेकडा ३५ या प्रमाणामुळे पहिला क्रमांक मिळवितात. तर जोशी हे शेकडा १५ प्रमाणामुळे शेवटच्या क्रमांकावर बसतात. पेंडसे कुळांतील स्वतंत्र धंदेवाल्यांची शेकडेवारी २२ आहे. नोकरी व स्वतंत्र धंदे यांतील तारतम्य कुलवृत्तान्तांत स्वतंत्र धंदे, उद्योग, व्यापार, इत्यादि भारदस्त शब्द वापरलेले आढळतात खरे, पण ते स्वतंत्र धंदे विशेष किफायतीचे आणि मानाचे असतातच असे नाहीं. हुंडीचा व्यवहार करणारा सावकार जसा स्वतंत्र धंदेवाला तसाच हिंग, जिरेंमिरे विकणारा अथवा शिवण्याचे एक यंत्र घेऊन शिलाईचे काम करणारा शिपीहि स्वतंत्र धंदेवाला गणला जातो ! यामुळे केवळ आंकडे आणि शंकडेवारी एवढ्यावरून नोकरीवरील लक्ष कमी होऊन उद्योगधंद्याकडे लक्ष लागत चाललें असें निश्चितपणे ठरेलच असे नाही आणि आता तर परकीय सरकार जाऊन स्वकीय सरकार आल्याने नोकरी पेशा कमी लेखण्याचे कारण नाहीं. याचा अर्थ ब्राह्मणांनी आपले लक्ष स्वतंत्र धंद्याकडे वळवू नये असा नव्हे. सध्याच्या परिस्थितीत नोकरी लाभणे दुर्घट होत जाणार असल्यामुळे नोकरीच्या पाठीस न लागतां स्वतंत्र धंदा शोधणे हे श्रेयस्कर होय, मात्र पूर्वी प्रमाणे नोकरी