पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ पेंडसे कुलवृत्तान्त [ प्रकरण

  • विलास लक्ष्मण (८) वय १५: गुण्यास ८ वींत आहे. * शशिकांत लक्ष्मण (८) वैये ९. गुण्यास ४ थींत आहे. * रवीन्द्रकुमार लक्ष्मण (८) वय ४. * रामचंद्र पांडुरंग (७) ग्वाल्हेर संस्थांनांत कॉन्ट्रेक्टर आहेत. वास्तव्य खाचरोद,

कन्या प्रेमिला, वय १०. ४ थींत शिकते. * सुधाकर रामचंद्र (८) वय १६. ग्वाल्हेरला ७ वीत शिकतो. . * प्रभाकर रामचंद्र (८) वय ४. पहिलीत शिकतो. गणेश भिकाजी (६) मृ. स. १९४६ सप्टेंबर २७. रतलामला रहात. कन्या (१) वेणू (इंदिरा); भ्र. हरी वासुदेव सोमण, देहली. (२) बनी, भ्र. गोपाळ लक्ष्मण मराठे, महेश्वर. (३) सुशीला, भ्र. प्रभाकर भास्कर मराठे, इंदूर. * श्रीनिवास गणेश (७) रतलामला पोलिस कमिशनरचे ऑफिसमध्ये हेडक्लार्क आहेत. भार्या (१) सुंदरा. (२) शालिनी, पि. केतकर, बहादरपूर. कन्या कुसुम, वय ७, पहिलीत शिकते. * विनायक श्रीनिवास (८) वय २. खंड पहिला, पृष्ठ २१० नागेश गणेश (८) भार्या गिरिजा (सोनू), पि. बाळकृष्ण गणेश कानिटकर, वाई. रामकृष्ण वामन (७) कन्या (२) दुर्गा, (इंदिरा), भ्र. वासुदेव हरी फडके, पुणे. राजाराम रामकृष्ण (८) मृत. घराणे ११ वें, हुबळी खंड पहिला, पृष्ठ २११ संशोधन क्र. २७ व घराणे ११ वे हुबळी हीं एक आहेत. म्हणून घराणे ११ ची वंशावळ पुढे दिल्याप्रमाणे होते. हीं एक असण्याची कारणे :- । हुबळी येथील घर व जमीन आहे त्यास फडणवीशी म्हणतात. यावरून कोणी पूर्वज फडणवीशीचे कामावर असावेत असे खंड १ मध्ये लिहिले होते. हा तर्क श. १७१७ तील पेशवे दप्तरांतील सनद उपलब्ध झाली आहे. (ऐ. क्र. ५३ पहा.) त्यावरून खरा ठरला. बाळाजी लक्ष्मण पेंडसे यास प्रो जुनी हुबळी येथील फडणिशी होती. त्याबद्दल त्यास सालीना रु. ३०७ मिळाल्याची नोंद इ. स. १८०२ मधील आहे. पुढे याजकडे पोतनिसी व दप्तरदारीहि होती. या, बाळाजी लक्ष्मणचा भाऊ सखंभट लक्ष्मण या नांवाचा याच काळांत म्हणजे श. १७३९ मध्ये होता.