पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९) मिळाल्याबरोबर कुल विस्तार जोराने होऊ लागला. त्या वेळची निर्वाहाची साधने कोणती होती व त्या पिढीतल्या जिवन्त व्यक्तींची संख्या किती होती हे पाहतां आल्यास संपत्तीचा कुलविस्ताराशी संबंध कसा पोचतो ते कळून येईल. कुलविस्तारांत क्रमवारी या कुलवृत्तान्तांत नमूद असलेल्या एकंदर पुरुष व्यक्तींची संख्या २५९५ (प्रथमावृत्ति) आहे. त्यांतून विद्यमान पुरुष व्यक्ती ९९९ वजा केल्यास बाकी १५९६ राहते. विद्यमान व्यक्ती तीन पिढ्यांच्या असू शकतात. कारण पेंडसे कुलांत जिवंत पणजोबा कोणीच नाहींत असे कुलवृत्तान्तांतच म्हटले आहे. कुलवृत्तान्तांत ज्यांची माहिती आली आहे अशा पिढ्यांची सरासरी संख्या ९ धरल्यास अविद्यमान पिढया ६ येतात. अविद्यमान ६ पिढ्यांतील व्यक्ती संख्या १५९६ आणि विद्यमान ३ पिढ्यांतील संख्या ९९९ यांचे प्रमाण पाहिल्यास अविद्यमान एको पिढीला २६६ व्यक्ती आणि विद्यमान एका पिढीला ३३३ व्यक्ती असे बसते. यावरून शें दोनशे वर्षांपूर्वी पेंडसे घराणी हल्लीच्या इतकीच असून व्यक्तींची संख्या कमी होती व अलीकडील शंभर वर्षांत ती वाढली, यावरून सांपत्तिक स्थितीत सुधारणा आणि कोंकणांतील वास्तव्य सोडून परप्रान्तांतील राणी यांचा परिणाम कुलविस्तारांत झाला असावा असे दिसते. | साठे घराण्यांतील मृतव्यक्तींची संख्या २४०० असून प्रत्येक पिढी अंदाजे ४०० व्यक्तींची होते. विद्यमान व्यक्ति १६०० असून पिढीची सरासरी ५३३ येते मराठे कुलांतील हेच आकडे अनुक्रमे ७२६० व २८६० असून जुन्या पिढीची सरासरी ७३३ व नव्या पिढीची सरासरी ९५३ येते. | वरील आंकड्यांवरून पेंडसे कुलापेक्षां साठे कुलाचा विस्तार अधिक आणि साठ्यांपेक्षां मराठ्यांचा विस्तार अधिक असल्याचे तर दिसून येतेच पण त्यांत हि नव्या पिढीतील वाढीचे प्रमाण अनुक्रमे शेकडा १२५।१३३ आणि १३० असे पडते. त्यांतहि पेंडसे यांचा क्रमांक तिसरा असून साठे हे मराठ्यांपेक्षां वर चढलेले दिसतात. ही सरासरी केवळ अनुमान धपक्याची आहे. कारण पूर्वीच्या कोणत्याही तीन पिढ्यांतील विद्यमान व्यक्तींची संख्या या कुलवृत्तान्तांतून नेमकी मोजून ठरविणे अशक्य आहे. तथापि सांपत्तिक सुस्थिति आणि स्थलांतर यांचा परिणाम कुलाच्या विस्ताराला अनुकूल झाल्यावाचून राहात नाहीं हे उघड आहे. वसतिस्थानांच्या संख्येत मराठे ११५, पेंडसे १४५ आणि साठे २२० असा चढता क्रम लागतोसा दिसतो. परंतु वसतिस्थानांच्या नोंदींची पद्धति सगळ्यांची सारखीच असेल असे म्हणवत नाही. याकरितां तदनुषंगिक अनुमानहि संशयास्पदच मानावे लागते. कुलाच्या सांपत्तिक स्थितिविषयक अनुमान शिक्षण आणि व्यवसाय यांवरून बांधता येते. ब्राह्मणांची मुलें प्राथमिक शिक्षण तर सर्रास घेतातच; हायस्कूलचे