पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) अद्यापि अप्रसिद्ध असलेले आणखी किती तरी कुलवृत्तान्त प्रसिद्ध झाले पाहिजेत. तथापि आजवर प्रसिद्ध झालेल्या कुलवृत्तान्तावरून विकासाची परमावधि झाली असून कांहीं आडनांवाचा लोप होऊ लागला असल्याची चिन्हें दृग्गोचर होत आहेत. मराठे आडनांवांतील जाईल, रटाटे हे पोटभेद इतके छोटे आहेत की, एकांत अवघ्या २९ व दुस-यांत अवघ्या १५ विद्यमान पुरुषव्यक्ति आहेत. नऊ दहा पिढ्यांत जर यांचा विस्तार एवढाच झाला तर यापुढे हे आडनांव वेगळे टिकू शकेल असे वाटत नाहीं. याच्या उलट ज्या मराठे कुलांतील कांहीं घराण्यांत विद्यमान नऊ बंधु इतकी मोठी संख्या दिसून येते त्या घराण्याचा विस्तार चालू आहे असे मानण्यास हरकत नाहों. | हा विस्तार वा संकोच कशावर अवलंबून आहे याचा शोध लावणे जरूर आहे. हा परिणाम शारीरिक आरोग्याचा, का वास्तव्यस्थानांतील हवापाण्याचा का सांपत्तिक स्थितीचा, का या सर्व कारणसमुच्चयाचा ? अर्थातच एकच कारण पूर्ण प्रभावी होऊ शकत नसल्याने या तीनहि कारणांचा संकलित परिणाम यांत दिसून येत असावा. या तिहींतून सांपत्तिक स्थिति दृश्य असून ती सुधारणें वा बिघडविणे त्या त्या कुलांतील व्यक्तीवर अवलंबून आहे. वास्तव्याच्या परिणामाचा विचार करतांना कोणता प्रांत आणि कोणती राहणी विकासानुकूल आणि कोणती प्रतिकूल हे ठरविणे आधीं कठीण आणि ते ठरवितां आलें तरी एकाएकी वास्तव्यस्थान बदलणे हे प्रत्येकाला सुलभहि नसते. शारीरिक प्रकृतीचा विचार तर सर्वांत अधिक गूढ आहे. डॉक्टर वा वैद्य कोणीहि अमुक घराण्यांतील स्त्री वा पुरुष वंश विस्ताराला अनुकूल वा प्रतिकूल असे निश्चितपणे सांगू शकत नाहीत. त्यामुळे या बाबतींत यदच्छेवरच अवलंबून राहावे लागणार. परंतु सांपत्तिक स्थिति आणि वास्तव्यस्थान या बाबतीत अनुकूल परिस्थिति प्राप्त करून घेणे पुष्कळांशाने आत्मस्वाधीन असल्याने त्या बाबतीत कोणाला काय करता येईल व कोणी काय करावे याचा विचार करणे जरूर आहे आणि असा विचार करण्याला साधन म्हणूनच तर कुलवृत्तान्त जमविण्याची व ते प्रसिद्ध करण्याची धडपड करावयाची. | कोणत्याहि कुलाची पूर्वपीठिका शोधीत गेल्यास अगदीं मूळचे नियहि साधन शेती हेच दिसून येते. त्यांतील पहिली पायरी नापीक जमीन कसून शेत लागवडीस आणणे ही असून त्यानंतर शेत जमीन इनाम मिळविणे ही दुसरी पायरी दिसते. इनामाची जमीन स्वतः धरून न कसण्याइतकी मोठी असल्यास जमीन • देऊन त्या उत्पन्नावर निर्वाह करणे ही तिसरी पायरी त्यानंतरची होय. खोलीचा समावेश यांतच होतो. याशिवाय पूर्वकालीन ब्राह्मणाच्या निर्वाहाचें दूसरे साधन वैदिकी हे होय. निर्वाहाची वर निदष्ट केलेली सर्व साधने जेमतेम पोटापरतें उत्पन्न देणारी असल्याने कुलाचा विस्तार न होता अनेक कुलें केवळ जीव धरून जगून राहिली. स्वराज्यांत पराक्रमाला आणि सांपत्तिक सुस्थिति येण्याला वाव