पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पॅडसे—कुल-वृत्तान्त [ प्रकरण 'घराणे ७ वें, केळशी | खंड पहिला, पृष्ठ १९३ केळशी येथे त्या गांवासंबंधीं कांहीं माहिती संग्रहित करून ठेविलेली आहे. तींत केळशीच्या पेंडसे घराण्यांतील एका व्यक्तीने लिहिलेली रोजनिशीची नक्कल आमचे मामेबंधु रा. जगन्नाथ वासुदेव जोशी यांस पहावयास मिळाली. ती वाचण्यास फार दुर्बोध होती. ती कितपत विश्वसनीय आहे याबद्दल शंका आहे. परंतु तिच्यांतील माहिती येथे देऊन ठेवण्यास हरकत नाही असे वाटल्यावरून देत आहों. "शकाच्या १३ व्या शतकांत केळशीची वसाहत झाली. श. १५१५ मध्ये अनंत महादेव पेंडसे केळशीस आले. (हा आदिलशाहीचा काळ आहे.) त्यांचे चुलतभाऊ मुर्डी गांवीं आले. श. १५८२ मध्ये अनंत महादेव कालवश झाले. त्यांस पुत्र पांच. (१) बापूजी, (२) दाजी, (३) महादेव, (४) कृष्ण, (५) नारायण. बापूजी अनंत यांनी वडिलांचे सांगीवरून श्रीदेव काळबहिरी (श्रीकाळभैरव ऊर्फ बहिरी) ची स्थापना केळशीमध्ये श. १६३५ मध्ये केली व देवालय बांधिले. श. १६७१ सालीं विसाजीपंत महाजन यांनी त्या देवळाचा जीर्णोद्धार केला." केळशीस असणारे पेंडसे हे त्या गांवचे महाजन असल्यामुळे कागदोपत्रीं महाजन आडनांव लावू लागले हे येथे सांगणे अवश्य आहे. | हे जीर्णोद्धार करणारे विसाजीपंत बापूजी अनंताचे कोण हे माहीत नाही. मुर्डीचे महाजन कृष्णाजी बापूजी यांचे वडील म्हणजे बापूजी हे, बसणीहून याच सुमारास मुर्डीस रहावयास आले असा पेंडसे-भट यांच्यांतील मुर्डीचे महाजनकीचे वादांत निर्देश आहे. (खंड १ पृष्ठ ३४). अनंत महादेवांचे चुलतबंधु मुर्डीस आले म्हणून जे वर लिहिले आहे ते हेच बापूजी असावे; तसे मानल्यास वंशावळ खालीलप्रमाणे मांडतां येईल. १ महादेव ।। २ अनंत (मृ. श. १५८२) बापूजी || (श. १५७०) ३ बापूजी दाजी महादेव कृष्ण नारायण कृष्ण • (श. १६३५) | (म. श. १६३२) केळशी गटांतील घराणीं ६ ते १० हयांत वरीलप्रमाणे वंशावळ आढळत नाहीं. परंतु याच सुमारास भास्करनाईक पेंडसे केळशीकर या नांवाची व्यक्ति होती. घराणे १ पिढी ५ पहा. (प्रथम खंड, पृष्ठ ३१ व ५९). शक १६७१ मध्ये विसाजीपंत महाजन यांनी देवळाचा जीर्णोद्धार केला. त्याच सुमारास म्हणजे श. १६८१ मध्ये केळशीस गोविंद हरी महाजन होते व