पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती ७३

  • -*:2".

Fine Futurthi

  • प्रभाकर विनायक (१२) ज. स. १९३१ ऑगस्ट ३१. वाङमय पहिले वर्षांत आहेत. * हनुमान विनायक (१२) ज. स. १९३७ मार्च १४. मराठी शिकतो. * भास्कर विनायक (१२) ज. स. १९३९ डिसेंबर २९. मराठी शिकतो.

घराणे ३ रे, गोळप-चौल-श्रीवर्धन | खंड पहिला, पृष्ठ १६९ सु. स. ११५६ मोहरम १७ (श. १६७७ आश्विन ब. ४ शुक्रवार, स. १७५५ ऑक्टोबर २४) ला राजपुरीपैकी भात श्रीवर्धनकर ब्राह्मणांस पेशव्यांनीं धर्मादाव करून दिले; त्यांत खालील दोन नांवे आढळतात :- १ हरभट चांगबोले २ महादेवभट चांगबोले नारो त्र्यंबक यांनीं भात कमजास्त केलें म्हणोन ज्यांचे कमी केले त्या ब्राह्मणांनीं विनंती केल्यावरून ३० (तीस) ब्राह्मणांस श. १६९७ मध्ये पेशव्यांनी भात करार करून दिले. (ऐ. क्र.४५ पहा.) यांत (१) बाबाजीभट चांगबोले, हरभट यांचे पुत्र, हरभट मृत्यु पावल्यामुळे (२) महादेवभट चांगबोले अशी नावे आहेत. | हे हरभट व महादाजीभट घराणे ३ मधील महादेव गणेश (५) व हरी गणेश (५) होत. महादेव गणेश (१०) यांस सध्या रोहें मामलतदार कचेरीतून रोख इनाम रु. ७ चालू आहे. हरभटाचे पांच पुत्र असल्याचे पृष्ठ ७९ वर दाखविलें आहे. त्यांत साबाजी व आबाजी असे दोन पुत्र आहेत; त्यांतील एक बाबाजी असावा. हरी गणेश हे वरील माहितीवरून श. १६७७ ते १६९७ या दरम्यान केव्हांतरी मृत्यु पावले असावे. त्र्यंबक महादेव (६) पे. द. कोंकण जमाव रु. १३८ मध्ये मौजे कुणे येथील शुक्ल यांची जमीन भाऊबंदकीमुळे सुटली होती ती त्र्यंबकभट पेंडसे यांजकडे होती अशी नोंद आहे. श. १७६३. खंड पहिला, पृष्ठ १७० रघुनाथ सीताराम (१०) भार्या जानकी. यांनी अखिल भारत हिंदु महिला सभा प्रचारकार्याकरितां १०० रु. दिले. * यशवंत रघुनाथ (११) शनवार पेठ, गृह क्रमांक ११४, पुणे ह्या स्वतःचे घरांत राहतात. भार्या (१) लक्ष्मी (गोदू), पि. बाळकृष्ण विष्णु मेहेंदळे, पुणे. भार्या (२) यशोदा (सुभद्रा), पि. शिवराम श्रीधर दीक्षित, पुणे. सर्व संतती हिची. कन्या कमल (सुमति), भ. भालचंद्र नारायण लिमये, पुणे.