Jump to content

पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. आमची विनंती स्वीकारून त्यांनी मालेवरहि जो अनुग्रह केला त्याबद्दल माला त्यांची सदैव ऋणी आहे. या पुस्तकाचें मुद्रणाचें काम माझे मित्र श्री. न. ह. देशपांडे संपादक 'बालवसंत' यांनीं आपल्या बालवसंत छापखान्यांत केले असून मुद्रितें तपासण्याचे काम श्री. पुराणीक व श्री. मोहरीर शिक्षक, खानदेशशिक्षणमंडळ अंमळनेर यांनी अत्यंत काळजीपूर्वक केलें आहे. याबद्दल या तिघांचाहि मी फार आभारी आहे.
 माझें निवेदन संपविण्यापूर्वी माले संबंधी दोन शब्द लिहि- लिहिण्याची वाचकांची परवानगी घेतो. येत्या जूनमध्ये मालेस सुरुवात होऊन अडीच वर्षे होतील. संकल्पाप्रमाणें तोंवर १० पुष्पें प्रसिद्ध व्हावयास पाहिजेत व तसा प्रयत्न मालेकडून कसोशीनें करण्यांत येईलहि. पण या बाबतीत पुढील अडचण अर्थिक आहे. अमेरिका पथदर्शक व राजर्षि भीष्म या पुस्तकांचे पुनर्मुद्रणाचे काम याच वर्षांत करावे लागल्यानेंहि नवीन पुष्पाच्या मुद्रणाचे काम थोडे मागे पडले मालेजवळ थोडाफार निधि असल्यास मालेची कामे वक्तशीरपणे होऊं शकतील. यासाठी ५०रु. चा एक असे ५००० रु. चे १०० डिबेंचर्स (कर्जरोखे) पांच वर्षे मुदतीचे विक्रीस काढण्याचें मालेनें ठरविलें आहे. मालेच्या सधन ग्राहकांनी मालेचे डिबेंचर्स घेऊन मालेच्या साहित्य प्रकाशनाच्या कार्यास आपलेपणाने मदत करावी अशी त्यांस नम्र विनंति आहे. डिबेंचर घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपला मनोदय कळविल्यास त्यांचेकडे यासंबंधीची 'सविस्तर योजना' पाठविण्यांत येईल.
 आणखी एका नवीन बाबीसंबंधी येथे खुलासा करणें प्राप्त