Jump to content

पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. वर्गणीदारांची अडचण दूर करणे हीच ती बाब होय. ६ व्या पुष्पांतील निवेदनांत वार्षिक वर्गणीसंबंधीं उल्लेख केला होता. वार्षिक वर्गणी ठरविणें हें मालेच्या व ग्राहकांच्या दृष्टीने सोयीचे व हिताचे आहे असें दिसून आल्यावरून येत्या जूनपासून वार्षिक वर्गणी दोन रुपये निश्चित केली आहे. ज्या वर्गणीदारास वा. व. ची योजना पसंत नसेल त्यांना पूर्ववतच पुस्तकें मिळू शकतील. वा. व. ठरविण्यांत आल्यामुळें आतां ५ रु. च्या साहाय्यकांचा वर्ग ठेवण्याची अवश्यकता नाहीं. वा. व त ५०० पृष्ठांचे वाङ्मय ग्राहकांस देण्याचे योजिलें आहे. वर्गणी मनी आर्डरीनें पाठविणाऱ्यांनी सव्वा दोन रुपये पाठवावे. व्ही. पी. २ रु. ६ आ. ची जूनमध्ये करण्यांत येईल. एजन्सीच्या ठिकाणी वर्गणी दोन रुपयेच फक्त पडेल.
 ग्रंथ मालेस उत्तरोत्तर वाढती साहित्य सेवा करण्याचें सामर्थ्य प्राप्त होवो अशी इच्छा व्यक्त करून हें निवेदन संपवितो.

नागपूर शहर
 श्रीधर नारायण हुद्दार.
७-६-१९२८