प्रकरण दुसरें. प्राचीनतर असली पाहिजे, हे कळून येतें. त्यावेळी ध्याकांडाचा समावेश होत असे ! ज्यांत आहे तें पातालखंड व तें ज्यांत आहे तें पद्मपुराण भवभूतीपेक्षां कांही भागांत तरी अतिप्राचीन आहे हैं जरूर कळून येतें; यावरून असा संभव आहे कीं, भवभूतीहून बऱ्याच प्राचीन अशा कालिदासाहूनही ह्या पुराणाचे बरेच भाग प्राचीनतर असावेत; यावरून कालिदासानेंच त्या त्या कथा या पुराणांवरून घेतलेल्या असण्याचा संभव आहे. ५७ बालकांडांतच अयो- यावरून रामाश्वमेधपर्व, व तें शिवाय, वनपर्वातील तीर्थवर्णनात्मक कांहीं भाग ( महाभारतांतला ) जर पद्मपुराणाशी जुळतो, तर हें पुराण व यांतील कांहीं मूळचे भाग महाभारताला सद्यःस्वरूप मिळाले तेव्हां होते म्हणण्यास काय हरकत आहे? भारतरामायणाव्यतिरिक्त इतर परंपराही या पुराणांत आढळतात. उदाहरणार्थ, जांबवानाचें अन्यथारामायण ( पाताळखंड अ. ११६ ) पहा; रामाश्वमेधपर्व पहा; तसेंच, लोमशरामायण पहा. यावरून, कदाचित् शकुंतलेची कथा व रामकथा यांतही जुन्या परंपरांवरूनच फरक असतील, तेच या पुराणानें कायम ठेऊन पुढील पिढ्यांस दिलेले असतील, व त्यांवरूनच कालिदासानें रघुवंश व शाकुंतल रचिलें असेल ! हेंच अधिक शक्य आहे. विष्णुपुराण, ३ रें. मत्स्यपुराणांत याचें लक्षण असें दिलेले आहे की, वाराहकल्पवृत्तांतं अधिकृत्य पराशरः । यत्प्राह धर्मानखिलांस्तदुक्तं वैष्णवं विदुः ॥ त्रयोविंशतिसाहस्रं तत्प्रमाणं विदुर्बुधाः ॥
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/७२
Appearance