पुराणानिरीक्षण. . तंत्र बाले मुनिकृतपुत्रेष्ट्या चतुरः सुतान् । प्राप पंक्तिरथः साक्षात् हरिं ब्रह्म सनातनम् ॥ ६४ ॥ स कौशिकमखं गत्वा सीतां उद्याथ भार्गवम् । आगत्य पुरमुत्कृष्टं यौवराजप्रगल्भकः || ६५ || मातृवाक्याद्वनं प्रागाद्नंगामुत्तीर्य पर्वतम् । चित्रकूटं महिलया लक्ष्मणेन समन्वितः ॥ ६६ ॥ भरतस्तु वने श्रुत्वा जगाम भ्रातरं नयी । तमप्राप्य स्वयं नंदीग्रामे वासमचीकरत् || बालमेतत् ; शृणुष्वान्यदारण्यकमथाखिलम् । पद्म, पाताळ, रामाश्व, अ. ६६. यांत भरताची व रामाची भेट न होतां तो परत नंदीग्रामास जाई- पर्यंतचा मजकूर बालकांडांतच आहे. शिवाय, पद्मपुराणामध्ये बाल, आरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध व उत्तर अशी सहाच कांडे रामायणांत असल्याचा उल्लेख आहे. यावरून ते वेळीं अयोध्याकांड स्वतंत्र नव्हतेंच हे कळून येतें. पण सातव्या शतकाच्या अखेरीस असलेल्या भवभूतीनें उत्तररामचरित्रांत म्हटले आहे की :-- “ बालकांडस्यांतिमेऽध्यायेऽयं श्लोकः । प्रकृत्यैव प्रिया सीता रामस्या सीन्महात्मनः । प्रियभावः स तु तया स्वगुणैरेव वर्धितः ॥ हा श्लोक सभ्यां बालकांडाच्या शेवटच्या सर्गात ( अध्यायांत नाहीं ) आहे. यावरून भवभूतीच्या काळीं आतांप्रमाणेच अयोध्याकांड होतें कळून येईल. पद्मपुराणाची ही रामायणसूची यावरून भवभूतीहून बरीच
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/७१
Appearance