Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. यांत विक्रमानंतर थोड्याच काळाने ( १०० वर्षानी ? ) शौनकादि ऋषि सूताकडे गेले तेव्हां त्यानें पुनः त्यांस पांच लक्ष श्लोकात्मक इतिहास- पुराणें सांगितलीं ! अठरा पुराणे मिळून चार लक्ष व भारत एक लक्ष मिळून पांच लक्ष संख्या होय. विक्रमाच्या मरणानंतर म्हणजे इ. स. च्या प्रारंभापासून सर्व पुराणें व भारत मिळून पांच लक्ष संख्या होती असे यावरून वाटतें. भारत ग्रंथ इ. स. ४०० च्या सुमारासच शत- ●साहस्रसंहिता ' रूप झालेला होता; व तो इ. स. च्या सुमारास याच स्वरूपांत होता हैं पाश्चात्य शोधकही कबूल करितात. ( वायुपुराणनिरी- क्षण पहा. ) तेव्हां विक्रमादित्यानंतर लौकरच पूर्वीचीं आदिपुराणें सद्य:-

२४

  • त्रिसहस्राब्दसंप्राप्ते कल्पे ( कलौ ) भार्गवनंदन ॥

आव॑ते शंखनामासौ सांप्रतं वर्तते नृपः ॥ ५-२७॥ म्लेंच्छदेशे शकपतिरथ राज्यं करोति वै । भविष्य० प्रतिसर्ग, अ. ५ विक्रमाख्यानकालोऽयं पुनर्धर्म करोति हि ॥ ३६ ॥ द्वादशाव्दशतं वर्ष द्वापरो हि प्रवर्तते ॥ तदंते भुवि कृष्णांशो भविष्यति महाबली ॥ ३७ ॥ भविष्य, प्रति० अ. २२ कल्पाची ३००० वर्षे गेल्यानंतर अवंतीमध्ये शंख राजा राज्य करीत होता; ' सांप्रतं वर्तते नृपः ' हे त्या वेळच्याशिवाय दुसरे कोण म्हणणार ? विक्रमा- पासून पुनः चांगले दिवस येतील अशी पौराणिकांस आशा होती; पण ती व्यर्थ झाली.विक्रमापासून १२०० वर्षांनी ( पृथ्वीराजाच्या वेळेस) एक ' कृष्णांश ' निप- जेल असें म्हटलेले आहे. वरील ' शंख ' च जैनांचा ' गर्दभिल्ल ' होय. या शंखाचाच पुत्र ' विक्रमादित्य ' असें भ. पुराणांत दिले आहे. भारतीय युद्धापासून याच्यापर्यंत १२०० वर्षे जाऊन ( म्ह० कलि संपून ) पुनः द्वापर सुरू होईल, अशी यांत आशा दिसते. कल्पापासून याच्या वेळेपर्यंत ३००० वर्षे झालीं होतीं. ( उत्तरार्धात सर्व खुलासा होईल.)