प्रकरण पहिले. स्वरूप पावलीं असे वाटते. त्या वेळी सूतानें तीं पुनः त्यांस ऐकविलीं याचा एरव्ही अर्थ काय ? याविषयी एवढ्यानेंच खात्री होत नसेल तर आणखी खालील प्रमाण पहा; याच पुराणाच्या प्रतिसर्गपर्वाच्या चौथ्या खंडाच्या प्रारंभी असें लिहिले आहे की: पुनर्विक्रमभूपेन भविष्यति समाव्हयः ॥ ३ ॥ नैमिषारण्यमासाद्य श्रावयिष्यति वै कथाम् । २५ पुनरुक्तानि तान्येव पुराणाष्टादशानि वै ॥ ४ ॥ तानि चोपपुराणानि भविष्यंति कलौ युगे । अध्याय १ ला. यावरून, विक्रमाच्या वेळी किंवा त्यानंतर लौकरच पूर्वीचीं व्यासोक्त आदिपुराणें पुनरुक्त झाली असे स्पष्ट दिसतें. नाहीं तर ‘ पुनरुक्तानि ' याचें स्वारस्य काय ? हीच गोष्ट अंतर्गत पुराव्यानेंही कळून येते. ती अशी:- मत्स्यपुराणांतील पुराणलक्षणाचा ५३ वा अध्याय १२ व्या शतकांतील अपरार्कानें आपल्या याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीकेंत उतरून घेतलेला आहे. यावरून तेव्हां हा पुराणवर्णनाध्याय मात्स्यांत होता हैं कळून येतें. तसेंच, इ. स. ६०० च्या सुमारच्या नारदपुराणसूचीच्या वेळीही मात्स्यांत हा पुराणवर्णनाध्याय होता है पुढे दाखविलेलें आहे. ( मत्स्यपुराणनिरीक्षण पहा ). तसेंच, मात्स्यांतीलच उतारे अग्निपुराणानें घेतलेले असल्यामुळे हल्लींच्या अग्निपुराणापेक्षां मात्स्याचें स्वरूप प्राचीनतर आहे व त्यांत तेव्हां हा पुराणवर्णनाध्याय होता हेंही पुढे दाखविलें आहे. ( मत्स्यपु० निरीक्षण पहा ). यावरून इ. स. २०० - ३०० च्या दर
- आनंदाश्रमप्रत, ग्रंथांक ४६, पृष्ठ ३९२-९६.