Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिलें. विलेलेच आहे. तेव्हां हा उल्लेख म्हणजे व्यासोक्त मूळ पुराणांचा असला पाहिजे. यावरूनच सिद्ध होतें कीं, हल्लींचीं पुराणें व्यासोक्त आदि- पुराणांवरून तयार केलेली आहेत. त्यांत बराच प्राचीन मजकूर असला तरी त्यांची घटना नवीन झालेली आहे. हा सिद्धांत ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर टिकतो की नाहीं हें आतां आपण पाहूं. मत्स्यपुराणांतून भारतानें वनपर्वात प्रळयकथा घेतलेली आहे; भारतांत ती साधी आहे; पण हल्लींच्या मत्स्यांत अद्भुतपणा अधिक आहे. यावरून भारतसद्यःकालीन मत्स्य व हल्लींचें मत्स्य एकच नसून आदिमत्स्यावरून ही भारतांतील गोष्ट घेतली असावी, असें जें कित्ये- कांचे मत आहे तें खरें दिसतें. २३ पुराणांचं सद्यःस्वरूप. - मूळचीं ( व्यासोक्त ) आदिपुराणें लुप्त होत असतां त्यांची पुनर्घटित अशीं सद्यः स्वरूपें केव्हां वनविण्यांत आली याविषय आतां चौकशी करूं; याविषयों सथ्यांच्या पुराणांत कोठें तरी माहिती मिळते काय हे आपण पाहूं:- विक्रमादित्य ( इ. पू. ५७ ) स्वर्गवासी झाल्यावर शौनकादि ऋषि सूताकडे जाऊन धर्म सांगण्याविषयी त्यास प्रश्न करूं लागले, असा प्रसंग भविष्यपुराणांत आलेला आहे:- शौनकाद्यास्तु ऋषयो ज्ञात्वा भूपस्य स्वर्गतिम् । गत्वा सूतं प्रणम्योचुः धर्म मुख्यं वदाधुना || तेभ्यः सूतः पुराणानि श्रावयामास वै पुनः ॥ १७ ॥ शतवर्षं पंचलक्षश्लोकमध्यापयन्मुदा । ते श्रुत्वा मुनयः सर्वे जम्मु स्वमालयम् ॥ १८ ॥ भविष्यपु • प्रतिसर्गपर्व, खंड २, अ. २३. ०