पुरवणी. ३२३ अग्निमित्राचा ( बंधु किंवा ) पुत्र सुमित्र याचा खून, मिलदेव किंवा मूलदेव यानें, नटांच्या गायनांत व नृत्यांत तो गढून गेलेला असतांना ( नटाचा वेष घेऊन ) केला. हा शुंगराजांपैकी पुष्पमित्राचा पुत्र जो अग्निमित्र त्याचा पुत्र वसुमित्र किंवा सुमित्र होय. ( ४ ) प्रशादुर्बलं च बलदर्शनव्यपदेशदर्शिताशेषसैन्यः सेनानीरनार्यो मौर्य बृहद्रथं पिपेष पुष्पमित्रः स्वामिनम् | * सैन्याची स्थिति दाखविण्याच्या निमित्ताने सर्व सैन्य दाखवून, ( बुद्धीनें जड ) असलेल्या मौर्यकुलांतील ( शेवटच्या ) वृहद्रथ राजाचा ( स्वामी- चा ) खून, त्याचा अनार्य सेनापति पुष्यमित्र यानें केला. हा मौर्यापैकी शेवटचा राजा होय. यावरून पुष्पमित्रानें शेवटचा मौर्यराजा बृहद्रथ यास मारून राज्य बळका- विल्यानंतरही ' सेनापति ' ही आपली पदवी कायम राखली होती असे दिसतें. पुष्पमित्रानें पाटलिपुत्रांत राजसूययज्ञ आरंभिला होता. अग्निमित्र विदिशा ( भिलसा ) नगरीत राज्य करीत होता. वसुमित्र आजाबरोबर तुरगरक्षणार्थ स्वारीवर गेला होता. सिंधूनर्दाच्या कांठीं यवनांनीं घोडा अडविला. तेव्हां वसुमित्रानें पराक्रमानें तो परत वळवून आणिला. आतां पुष्पमित्र यज्ञार्थ दीिक्षित होत आहे; याच वेळचें हे पत्र आहे. याच पुष्पमि- लाच्या यज्ञाचा उल्लेख पतंजलि महाभाष्यांत ' इह पुष्पमित्रं याजयामः । याप्रमाणें ( पाटलिपुत्रांत राहून ) करितात. या सर्व गोष्टी ( ३१२-१३७ - इ० पू० १७५ नंतर पांचपंचवीस वर्षांनी घडल्या असाव्यात. ( इ० पू० १७५ - १६५ ) यानंतर लौकरच पांचपंचवीस वर्षांनी पतंजलि झाले असावेत.
- ततः पुष्पमित्रः सेनापतिः स्वामिनं ( बृहद्रथं ) हत्वा राज्यं करिष्यति ।
विष्णुपुराण २-२४-९.