Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. ३२४ ( ५ ) आश्चर्यकुतुहली च चंडीपतिर्देडोपनतयवननिर्मितेन नभस्तल- यायिना यंत्रयानेनानीयत क्वापि काकवर्ण: शैशुनागि-(रि ) र्नगरोपकंठे च कंठे विचकृते निस्त्रिंशेन । * यवनांस जिंकल्यानंतर यवनांनी युक्तीनें शिशुनागात्मज काकवर्ण यास आकाशयानानें लांब नेऊन ठार केलें ! ( ६ ) अतिस्त्रीसंगरतं अनंगपरवशं शुंगं अमात्यो वसुदेवो देवीभूत दासीदुहित्रा देवीव्यंजनया वीतजीवितमकारयत् ॥ अतिशय कामुक अशा शुंगांपैक ( शेवटचा राजा देवभूति यास ) त्याचा मंत्री वसुदेव यानें दासीची मुलगी राणी म्हणून त्याजकडे पाठवून तिजकडून त्यास ठार करविलें ! # शिशुनागपुत्र काकवर्ण यास यवनांनी ठार मारिलें, ही परंपरा हर्षानें ७ व्या शतकाचे प्रारंभ दिली आहे. हा काकवर्ण इ० पू० ७०० हूनही थोडासा प्राचीनच होय. याच्या वेळी आलेले हे यवन कोण ? हे ग्रीक कसे असणार ? कारण, ग्रीक प्रथमच इ० पू० ३२७ त इकडे आले ? हे यवन कोणी तरी वेगळे असले पाहिजेत, असें मानणें जरूर आहे.

  • ततश्च शिशुनागस्तत्पुत्रश्च काकवर्णः ।

विष्णुपुराण ४-२४-३. देवभूतिं तु शुंगराजानं व्यसनिनस्तस्मै वामात्यः काण्वो वसुदेवनामा निपात्य स्वयमवन भोक्ता । वि० पु० ४-२४-११.