पुराणनिरीक्षण. हन्तींच्या वनांत विहार करण्याची संवय असलेल्या वत्सपति ( उदय- नास ) कृत्रिम हत्तींच्या पोटांत लपून बसलेल्या महासेनाच्या (प्रद्योताच्या) • सैनिकांनी पकडून नेलें. टीकाकार म्हणतो महासेन नांवाच्या ( प्रद्योत ) उजायेनीच्या राजाच्या मनांत आपली मुलगी वासवदत्ता वत्सांचा राजा उदयन यास द्यावयाची होती; म्हणून त्यास अशा युक्तीनें पकडून आणिलें. हा बुद्धकालीन चंद्रवंशीय राजा होय. अशीच कथा गुणोदयाच्या बृहत्क- थेंत आहे. ( कथासरित्सागर पहा; व तसेंच मागें पृ. २०८ पहा. ) ( ३ ) अतिदयितलास्यस्य च शैलूषमध्यमधारस्य मूर्धानं असिलतया मृणालमिवाऽलुनादग्निमित्वात्मजस्य ( मिलाग्रजस्य ) सुमित्रस्य मित्रदेवः (मूळदेवः ) । * ०
- ( पुष्पमित्रस्य ) आत्मजोऽग्निमित्रस्तस्मात्सुज्येष्ठः ततो वसुमित्रो ।
वि० पु०४-२४-१०. यांतील ‘ सुज्येष्ठ ’ हें विष्णुपुराणकर्त्यांनी ज्या मुळावरून घेतले असेल त्यांत विशेषणच असावें; व सुमित्र हा अग्निमित्राचा वडील पुत्र असावा. कालिदासानें मालविकाग्निमित्रांत, पुष्पमित्राचें अग्निमित्रास आलेले एक पत्र दिलेलें आहे, त्यांत वसुमित्र हा अभिमित्राचा पुनच म्हटलेलें आहे:-- स्वस्ति | यशशरणात्सेनापतिः पुष्पमित्रो वैदिशय्यं पुत्रं आयु- ष्मतं अग्निमित्रं स्नेहात्परिष्वज्य अनुदर्शयति । विदितमस्तु । योऽ सौ राजसूययज्ञे दीक्षितेन मया राजपुत्रशतपरिवृत्तं वसुमित्रं गोप्तारं आदिश्य संवत्सरोपावर्तनीयो निरर्गलस्तुरगो विसृष्टः स सिंधोदक्षिणरोधसि चरनश्वानीकेन यवनानां प्रार्थितः । तत उभयोः सेनयोर्महानासीत्समर्दः ततः परान्पराजित्य वसुमित्रेण धन्विना । प्रसह्य ह्रियमाणो मे वाजिराजो निवर्तितः ॥ सोहमिदानीं अंशुमेतव सगरः पौत्रेण प्रत्याहताश्वो यक्ष्ये । तदिदानीं काल- हनिं विगतरोषचेतसा भवता वधूजनेन सह यज्ञसंदर्शनाय आगंतव्यम् । ( पुढें चालू ) ३२२