Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरवणी हर्षचरित्रांतील कांहीं ऐतिहासिक उल्लेख. इ० स० ६०८-६४८ च्या सुमारच्या हर्षचरित्रांत खालील पौरा- णिक राजांविषयीं कांहीं महत्त्वाचे ऐतिहासिक उल्लेख, साहाच्या उच्चा- साच्या अखेरीस मिळतात:- ( १ ) नागकुलजन्मनः सारिकाश्रावितमंत्रस्य आसीन्नाशो नागसे- ३२१ नस्य पद्मावत्याम् । * पद्मावती नगरीत नागसेनराजा कांहीं गुप्त खलवत करीत असतां, सारिकेनेँ तो वृत्तांत ऐकिला व त्यायोगें नागकुलोत्पन्न नागसेन प्राणास मुकला. शंकरकृत संकेतटीकेंत याचा खुलासा असा केलेला आहे कीं, नागसेन नांवाचा राजा पद्मावतीनगरींत राज्य करीत होता; त्याच्या मंत्र्यानें त्याचें अर्धे राज्य बळकाविलें होतें. त्या मंत्र्याचें शासन कसे करावें यावि- पर्यो राजा खलबत करीत असतां सारिका जवळ होती. पुढें ती सारिका मंत्री आला असतांही तेंच बोलली. त्यानें मंत्री सावध होऊन त्यानें विश्वा- सानें राजाचा खून केला. पद्मावर्तीत इ. स. ४०० ते ५०० च्या दर म्यान नागकुळीचे राजे राज्य करीत असत. ( कैलकिल यवनांची सवि स्तर माहिती पहा; पृ. २२९ ). ( २ ) नागवनविहारशीलं च मायामातंगांगान्निर्गता महासेनसैनिका वत्सपतिं न्ययंसिषुः ॥

  • नवनागाः पद्मावल्यां कांतिपुर्या मथुराय ( भविष्यंति ) वि० पुराण ( ४

-२४-१८. इ० स० च्या पांचव्या शतकांत नागराजे पद्मावती कांतिपुरी व मथुरा या तीन ठिकाणीं राज्य करीत असत असे वाटतें. समुद्रगुप्ताच्या प्रयाग • येथील स्तंभावरील लेखांतील राजे पहा. २१