या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
३२० पुराणनिरोक्षण. युगांपासून, म्हणजे ४ वर्षाच्या चौकडीपासून १२००० वर्षाच्या चौकडी - पर्यंत व तेथून १२००० X ३६० = ४३२०००० वर्षांच्या चौकडी- पर्यंत कसकशी युगांची परिणति झाली याचा इतिहास या पुस्तकांत दिले- लाच आहे. वाचकांना उत्तरार्ध विशेष कठिण वाटला असेल अगर त्यांतील गोष्टी त्यांस नूतन वाटल्या असतील, तर त्यांनीं तो भाग पुनः पुनः वाचावा; म्हणजे उत्तरार्धातील विधानें सत्य आहेत की असत्य आहेत याबद्दल त्यांस निर्णय करितां येईल. इतकें लिहून व शांतपणें माझें पुस्तक वाचल्याबद्दल वाचकांचे आभार मानून मी त्यांची रजा घेतों.