३१०२ सुमारें २६०० ३२३ ३१२ ग्रकरण सहावें. ३१५ प्रळयापासून कल्पारंभापर्यंत झाली होती असें म्हणतो.. ही माहिती त्यानें इ. स. ९ व्या शतकांत भारतीय ग्रंथांवरूनच दिलेली आहे. स्वायंभुव मनूचा काळ ( ग्रीकांच्या पिढ्या यापासूनच आहेत). वैवस्वत मनूचा व इक्ष्वाकूचा काळ. स्वायंभुव मनूपासून याच्या वेळेपर्यंत १९ पिढ्या झाल्या होत्या. अलेक्झांडरचें मरण. यावेळी दक्षाच्या जन्मापासून ५४५१ वर्षे झाली होती, असे ग्रीक लेखांवरून कळतें. चंद्रगुप्ताचा राज्याभिषेक - यावेळी दक्षापासून ५४६२ वर्षे झालीं होतीं. चंद्रगुप्ताच्या वेळी जो काळ ५४६२ वर्षीचा होता तोच मौर्यवंशां- तील शालिशूकाच्या वेळी ५५५५ वर्षांचा असावा. मौर्यकुलांतील राजे विष्णुपुराण मतें चंद्रगुप्त - बिंदुसार- अशोक सुयशा - दशरथ - शालिशूक असे आहेत. अशोकाचा नातु संप्रति हा चंद्रगुप्तानंतर ९० वर्षांनी राज्यारूढ झाला असें जैन इतिहासावरून कळतें. त्यानंतर शालिशूक आला. विष्णु- पुराणांतील दशरथ हा संप्रतीचा बंधु अगर दशरथच असावा. सारांश शालिशूक इ. पू. सुमारें ३१२ - ९० = २२२ नंतर काही वर्षानी राज्यावर आला असावा. संप्रतीचें राज्य किती वर्षे झाले हैं कळत नाहीं." संप्रतीच्या वेळीं दक्षकाळ ( ५४६२ + ९० =) ५५५२ वर्षांचा झाला होता. पुढें २१४ वर्षे संप्रति झाल्यानंतर इ. पू. ५५५५ च्या सुमारास शालिशूक राज्यारूढ झाला असावा. हीच गोष्ट वृद्धगर्गाच्या बृहद्गागीय संहितेच्या युगपुराणांत सांगितली आहे. ( डेक्कन कॉलेज प्रत, नंबर ३४५ साल १८७९-८० )
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३३०
Appearance