पुराणनिरीक्षण, दुसऱ्या एका स्थळीं स्पटेंक्स, व त्याचा मुलगा बौध्यस् हे भारतीयांवर ५२ व २० वर्षे राज्य करीत असल्याबद्दल उल्लेख आहे. The son of the latter was Kradeus ( श्राद्धदेव ? ) Ibid P. 201. सारांश, ग्रीकांनी तीन भिन्न भिन्न वेळच्या व्यक्तींचा घोटाळा केलेला आहे. ( १ ) दक्ष ( बॅकस् ) ऊर्फ दाक्षायण्य ( डायॉनिसॅस ) ; ( २ ) स्वायंभुव मनु ( ३ ) कनिष्ठदक्ष ( वैवस्वतमनु ऊर्फ श्राद्धदेव याचा आजा ) या तिहींचा ग्रीकांनी घोटाळा केलेला आहे. आपल्या पुराणांतून तरी, पूर्वकल्पांतील चाक्षुष मन्वंतराच्या सुमारास असलेला दक्षच हल्लींच्या कल्पांत ( वैवस्वत मनूचा आजा ) प्रचेत्यांचा पुत्र होऊन जन्मला, अशी परंपरा आढळते; तसेंच, चाक्षुष मन्वंतरांतील ( पूर्वकल्पांतील ) सत्यव्रत मनूच या कल्पांत वैवस्वत मनु झाला, अशीही परंपरा आढळते. या एकंदर विवेचनांवरून एवढे ठरतें कीं ग्रीकांनी कालगणना ज्येष्ठदक्षापासून दिली व पिढ्या स्वायंभुवमनूपासून दिल्या. या सर्व विवेचनावरून निघणारे काळ :- ३१४ इ० पू० ५७७४ o ५६९४-५४०६ पूर्वकल्पांतील चाक्षुष मन्वंतराचा काळ. यांत कश्यप प्रजा- पति वगैरे प्रजापति होते. ५४०६ते५ ११८ ५३२८ दक्ष प्रजापतीचा काळ; हा चाक्षुष मन्वंतराच्या प्रारंभी- ८० वर्षांचा असावा. चाक्षुष मन्वंतरानंतरच्या वैवस्वत मन्वंतराचा काळ. चाक्षुष मन्वंतर संपल्यानंतर सत्यव्रत मनूच्या वेळी प्रळय घडून आला. तो अल्बुमझारच्या भारतीय प्रमाणाप्रमाणें इ. पू. ५३२८ वर्षी येतो. सत्यव्रत मनूच्या वेळीं चाक्षुष मन्वंतर संपल्यानंतर झालेल्या प्रळयाचा काळ. अल्बुमझार हा २२२६ वर्षे
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३२९
Appearance