Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावें. ३१३ याप्रमाणें स्वायंभुवमनूपासून चंद्रगुप्तापर्यंत १५३-१५४ पिढ्या दिलेल्या मॅगस्थीनसच्या बरोबर आहेत; राजसंस्था पृथु वैन्यापासून सुरू झाल्या- मुळे त्यानंतर स्वायंभुव मनूपासून राजांची गणना पौराणिकांनी केली असावी. पिढ्यांचा हिशेब जमतो पण कालगणनेचा कांहींच पत्ता लावतां येत नाहीं, असें फर्ग्युसनसाहेब म्हणतात:- The second part of the statement giving the kings' reigns an average duration of nearly 40 years, must of course be rejected. ” या कालगणनेचा व्हावा तसा उपयोग यापूर्वी झाला नाहीं; कारण, पिढ्यांचा प्रारंभ स्वायंभुव मनूपासून झालेला आहे; व कालगणनेचा उगम पूर्वकल्पांतील दक्ष प्रजापतीपासून झालेला आहे. दोन्हीचा प्रारंभ एकाच वेळेला झालेला नाहीं. ग्रीक लोकांनी पूर्वदक्ष, स्वायंभुव मनु व वैवस्वत मनु यांचा फार घोटाळा केलेला आहे. त्यांस पूर्वदक्ष माहीत होता की नाही हे आपण पाहूं. 7 Dionysus Bacchus विषयीं ग्रीक काय काय लिहितात, हें आपण पाहूं:- - one of “ But when he ( Dionyssos ) was leaving India, he appointed, it is said, Spatembus ( स्वयंभू मनु ? ), his companions. When Spatembus died, his son Boudh- yas ( बुध ) succeeded to his sovereignty " Ancient India, P. 200. दुसऱ्या एका स्थळी डायानीसॉस ह्या नांवाच्या तीन व्यक्तींचा उल्लेख आहे:- Now, some, supposing that there were three indivi- duals of this name, who lived in different ages, assign to each appropriate achievement. They say, then, that the most ancient of them was called Indos. ( Ibid, p. 36 )

  • His. of Ind. Architecture.

66