प्रकरण सहावें. ( २५९३ + ३१ ०२ = ) ५६९४ ते ५४०६ पर्यंत होते. कश्यप प्रजापति व त्याचा सासरा दक्ष प्रजापति इ. पू. ५६९४ च्या सुमारास झाले ! दक्ष प्रजापतीचा हा काळ ग्रीक ग्रंथांवरूनही खरा ठरतो. मेगस्थीनीस हा ग्रीक वकील चंद्रगुप्ताच्या दरबारों होता; यानें हिंदुस्थानावर एक ग्रंथ लिहून ठेविला होता; तो लुप्त होऊन त्यांतील लोटक उतारे इतर ग्रीक लेखकांनी घेतलेले आढळतात. ऐरियन ( इ. पू. १४६ ) मध्यें असा उतारा येतो:- “ From the time of Dionysus to Sandracottus, the In- dians counted 153 Kings and a period of 6042 years; but among these a republic was thrice established, and another to 300 years and another to 120 years. "" . प्लिनि ( इ.स ४१ ) लिहितो की:- “ From the days of father Bacchus to Alexander the Great, their Kings are reckoned at 154, whose reigns extend over 6431 years and 3 months " * सोलिनस ( इ. स. १३८ ) लिहितो की:- “ Father Bacchus was the first who invaded India and was the first of all who triumphed over the vanquished Indians. From him to Alexander the Great, 6451 years are. reckoned with 3 months additional, the calculations being made by counting the Kings who reigned in the interm ediate period to the number of 153. " * ही इ. पू. ३०० च्या सुमारची माहिती आहे, यावेळी युगांची मोठी कल्पना बिलकुल आढळत नाहीं. मॅगेस्थीनीसच्या मतें, भारतीयांची
- Mc. Crindle's Ancient India, p. p. 115 & 203-204.
- Mc. Crindle's Ancient Iudia, P115.