पुराणनिरीक्षण. याप्रमाणे पूर्वकल्पांतील चाक्षुष मन्वंतरांतील प्रजापतींना येथें देवनिकाय म्हटले आहे. पृथु वैन्यापूर्वी राजसंस्था आर्योत नव्हती; तेव्हां प्रजापतिपद्धति होती ( Patriarchs ); यांस वेदांत विश्पति म्हटलेले आहे. वेदांतील विश्पतींवर राजन्य असत. गृहपतींवर कुलपति, त्यांवर विश्पति, त्यांवर एकादा राजन्य – अशी परंपरा वैदिक काळीं असे. ३०८ दक्ष प्रजापति व त्याचा जामाता कश्यप प्रजापति हे पूर्वकल्पांतील चाक्षुष मन्वंतरारंभी होऊन गेले, हें शिवपुराणांत स्पष्टपणें सांगितलेलें आहे:- सामुद्री सुषुवे पुलान्दश प्राचीनबर्हिषः । - सर्वे प्राचेतसा नाम धनुर्वेदस्य पारगाः ॥ ५६ ॥ एषां, स्वायंभुवे, दक्षः पुत्रत्वमगमत्पुरा । त्र्यंबकस्य शापेन चाक्षुषस्यांतरे पुनः ॥ ५७ ॥ वायवीय संहिता, अ० १५. मागील संदर्भावरून याचा अर्थ – ( पूर्व कल्पाच्या चाक्षुष मन्वंतरां- तील दक्ष प्रजापति शंकरांच्या शापानें हल्लींच्या कल्पांतील स्वायंभुव मन्वं- तरांत दहा प्राचेत्यांचा पुत्र होऊन जन्मला ! F पूर्व कल्पांतील दक्ष ज्येष्ठ असून हल्लींच्या कल्पांतील कनिष्ठ होय. पौरा- णिक कालगणनापद्धतीप्रमाणें चाक्षुष मन्वंतराचा काळ काढूं. हल्लींचा कल्प इ० पू० ३१०२ साली सुरू झाला. चौदा मन्वंतरांचा एक कल्प चौदा मन्वंतरांची क्रमानें नांवें पूर्वी दिलेलींच आहेत. स्वायंभुव, स्वारो- चिष, औत्तमि, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, या सात मन्वंतरांनंतर आणखी सात मन्वंतरें आहेत; याप्रकारें पहातां हल्लींच्या कल्पापूर्वीचें नववें तें चाक्षुष मन्वंतर होय. एक मन्वंतर= २८८ वर्षे. यावरून चाक्षुप मन्वंतर ( कल्पापूर्वी ) २८८ x ९ = २५९२ वर्षांनी सुरू झालें हैं कळतें; व तें २८८ वर्षे होतें; म्हणजे पूर्वकल्पांतील चाक्षुष मन्वंतर इ.पू.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३२३
Appearance