प्रकरण सहावें. इमां विस्सृष्टिं दक्षस्य यो विद्यात्सचराचराम्|| ३ || प्रजानामायुषा पूर्वा ब्रह्मलोके महीयते ॥ ४ ॥ यावरून दक्ष ज्येष्ठ व कनिष्ठ असे निदान दोन तरी असल्याचें कळून येतें. दक्ष, कर्दम, वीरण, कश्यप वगैरे पूर्वकल्पांतील प्रजापति होते असें दिसतें. हे पूर्वकल्पांतील होते, यास प्रमाणाः - दानाच्छुणुध्वं विजेंद्राः कश्यपस्य प्रजापतेः ॥ अदितिर्दितिर्दनुश्चैव अरिष्टासुरसाखसाः । सुरभिर्विनता चैव ताम्रा कोशवशा इरा || कद्रुर्मनुश्च भो विप्रास्तास्वपत्यानि बोघत ॥ + + + + पूर्वमन्वंतरे श्रेष्ठा द्वादशासन्स्सुरोत्तमाः ॥ एवमुक्त्वा च ते सर्वे चाक्षुष्यस्यांतरे मनोः ॥ मारीचात्कश्यपाज्जातास्त्वदित्यां भूरितेजसः || ब्रह्मपुराण - अ. १ यावरून दक्ष, कर्दम, कश्यप वगैरे प्रजापति ( मध्य आशियांत ) पूर्वकल्पांतील चाक्षुष मन्वंतरामध्ये किंवा त्या सुमारास होऊन गेले, असे कळतें. कश्यप प्रजापति हा पूर्वकल्पाच्या चाक्षुष मन्वंतराच्या प्रारंभी होता; त्याने दक्ष प्रजापतीच्या १३ मुलींशी लग्न केले. यावरून दक्ष प्रजापति जरा चाक्षुष मन्वंतराहून ५०-६० वर्षांनी प्राचीनंतर दिसतो. हल्लींच्या पुराणकर्त्यांस ह्या व्यक्ति देवतास्वरूप होऊन गेल्या होत्याः- चाक्षुषस्यांतरे पूर्वे आसंस्ते तुषिताः सुराः । एवं देवनिकायास्ते संभवंति युगे युगे ॥ -
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३२२
Appearance