पुराणनिरीक्षण. यावरून इल हा किंपुरुषवर्षीतील वाल्हीक शहरों राज्य करीत होता असे दिसतें. तसेंच, इला ही या इलाचीच कन्या असावी. तिनें बुधाशीं लग्न केलें. इल यास शशबिंदु नांवाचा एक पुत्र होता. सुतो धर्मपरो ब्रह्मन् ज्येष्ठो मम महायशाः । शशबिंदुरित ख्यातः स मे राज्यं प्रपत्स्यते ॥ यावरून बाल्हीक ऐल राजे व इंदुवंशीय राजे यांचा संबंध याप्रमाणें दिसतो:- २७२ इल ऊर्फ सुझुम्न । शशविंदु युवनाश्व | 1 विंदुमती x मांधाता इंदु इला X बुध 1 पुरूरवस् पुरुकुत्स बाल्हीकदेशच्या इल राजवंशाचा संबंध एकेच काळी चंद्रसूर्यवंशांशीं याप्रमाणे घडले. इलापति बुध यानें आंगिरस् कुलांतील संवर्तास आपला पुरोहित केला. इल कार्दमेयानें अश्वमेध यज्ञ केला, त्यांची तयारी संवर्ताचा शिष्य मरुत्त यानें केली:- संवर्तस्य तु राजर्षिः शिष्यः परपुरंजयः । मरुत्त इति विख्यातस्तं यज्ञं समुपाहरत् || रामायण, ७-९०. नंतर इंदुवंशांतील बुध ह्यानें आर्यावर्तात येऊन प्रतिष्ठान ऊर्फ प्रयाग
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२८७
Appearance