प्रकरण चौथें. यांत आलेला हर्यश्व ऊर्फ पृषदश्व (वसुमनाचा पिता) यादींतील २३ व राजा होय. विष्णुपुराणांत यास पृषदश्व म्हटलेलें आहे. आनंदरामायण व भविष्यपुराण यांत यास हर्यश्व म्हटलेले आहे. हरिवंशादिकांत याचें नांवच नाहीं. आतां आपण ययातीचे पूर्वज पाहूं. इल ऊर्फ सुद्युम्न । ऐल पुरूरवस् आयुस् नहुष नाहुष ययाति । २७१ । रामायण उत्तरकांड, अ. ८७ मध्यें इल हा कर्दम प्रजापतीचा पुत्र व वाल्हीक देशचा राजा होता असे म्हटलेले आहे. हा एकदां चैत्ररथ वनांत गेला. चैत्ररथवन किंपु- रुषवर्षात होतें. इलास सुद्युम्न असे नांव असून तो किंपुरुषवर्षाचा राजा असावा. याची राजधानां वाल्हीक शहर होती:- पुरु यदु }{द्रुह्य तुर्वसु अनु }{ माधवी श्रूयते हि पुरा सौम्य कर्दमस्य प्रजापतेः । पुत्रो बाल्हेश्वरः श्रीमान् इलो नाम सुधार्मिकः ॥ + + + + + बुध्या च परमोदारो बाल्हीकेशो महायशाः [ रामायण, ७-८७. कथा अशी आहे की, इलाचीच इला झाली व तिनें बुधाशी लग्न लाविलें. इलेची दासी म्हणाली :- अत्र किंपुरुषा नाम यूयं शैलस्य रोधसि । वत्स्यथाऽस्मिन् गिरौ शीघ्रं अवकाशो विधीयताम् || -
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२८६
Appearance