प्रकरण चौथें. २७३ एथे आपली राजधानी स्थापिली ! हा इंदुवंशाचा आर्यावर्तीतील प्रारंभ होय. इक्ष्वाकूबरोबरच कांहीं बुधाचा वंश सुरू होत नाहीं. शशबिंदु बाल्हीक देशांतच राज्य करीत असे. राजा तु बाल्हिमुत्सृज्य तथा देशं ह्यनुत्तमम् । निवेशयामास पुरं प्रतिष्ठानं यशस्करम् ॥ शशबिंदुस्तु राजाऽसीद्वाल्ह्यां पुरपुरंजयः । प्रतिष्ठाने इलो राजा प्रजापतिसुतो बली ॥ ऐलः पुरूरवा राजा प्रतिष्ठानमवाप्तवान् ॥ रामायण, ७-९०. बुध किंवा ऐल पुरूरवा हा प्रयागांतील पहिला इंदुवशीय राजा होय. इलाचा पुत्र शशबिंदु याची कन्या बिंदुमती इजशीच मांधात्यानें लग्न केलें. इलावर्त हा बाल्हीकाजवळचा प्रदेश दिसतो. आर्यावर्ताप्रमाणेंच इलार्वत शब्दही झालेला आहे. बाल्हीक देशच्या या राजवंशाचा संबंध अयोध्येच्या सूर्यवंशाशी व प्रयागच्या चंद्रवंशार्शी कोणत्या प्रकारें झाला है वर दाखवि- लेलेंच आहे. वनपर्वाच्या १२६ अध्यायांत यौवनाश्व मांधाता हा सौद्युम्नी ( शशबिंदू)चा समकालीन म्हणून सांगितलेले आहे. येथेंही या मांधात्या- कडून गांधारदेशचा इंदुवंशीय राजा ( अंगारकेतु ) मारला गेला असें म्हटलें आहे. याला शशबिंदूची पुत्री जी बिंदुमती तिच्या पोर्टी पुरुकुत्स-अंब- रीष व मुचकुंद असे तीन पुत्र झाले. ( भागवत, ९-६ ). आतां आपण मरुत्ताचे पूर्वज पाहूं:- १८ -
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२८८
Appearance