Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. भारतीय युद्धाचा काळ. भारतीय युद्धाचा वर ठरविलेला काळ ( इ. पू. १२६३ ) खरा आहे याबद्दल नवीनच कांही प्रमाणेंही उपलब्ध झालेली आहेत. पृथ्वी- राजरासो या ऐतिहासिक काव्याचा कर्ता चंदबरदाई यानें पृथ्वीराजा विषयीं अनेक हकीकती दिलेल्या आहेत; यांतच त्यानें पृथ्वीराजाविषयीं काळही दिलेले आहेत. चंद कवीच्या या काळांविषयीं व त्या वेळच्या इतर कालगणना दर्शविणाऱ्या ताम्रपटादि लेखांविषय हिंदी हस्तलिखित प्रती- च्या शोधाबद्दल ( १९०० सालचा ) रिपोर्ट करणारे पंडित श्यामसुंदर- दास बी. ए. यांनी चर्चा केलेली आहे. चंदानें पृथ्वीराजाच्या चरित्रांतील काळ असे दिलेले आहेत:- २३८ गोष्टी - रासोचे काळ पृथ्वीराजा- चें वय. जन्म |१११५ - १६ दत्तक ११२२-२३ कनोजला जाणे ११५१-५२ शेवटचें युद्ध |११५८-५९ ४३ ७ खरे काळ विक्रम संवत् अंतर |१२०५ - ६९०-९१ १२१२-१३९०-९१ १२४१-४२९०-९१ १२४८-४९९०-९१ याप्रमाणे या चारी गोष्टींच्या काळाविषयीं प्रचलित विक्रम संवतपेक्षां नेमानें ९० – ९१ वर्षीनीं कमी असा काळ चंदानें रासोमध्यें दिलेला आहे. हें ९०-९१ वर्षीचें अंतर नियमितपणें कां पडावें, याविषय शोध करीत असतां पंडित श्यामसुंदर यांस आढळून आले की त्या काळच्या इतर ताम्रपटादि लेखांतील काळांतही विक्रमसंवतपेक्षां ९०-९१ वर्षांचें अंतर पडतें. चंदाच्या व या ताम्रपटांच्या काळांवरून वरील लेखक म्हणतात की:-