Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें. सारांश, इ० स० ४५० ते ७५० पर्यंत पुराणांस हलींचें स्वरूप मिळाले आहे. कैनकिल खरोखर ५५० च्या सुमारास संपले. त्यानंतर ५०-६० वर्षांनी म्हणजे ६०० च्या सुमारास शेवटच्या भविष्याचा संस्कार झाला ! ! ! २३७ 0 यावरून, तीनचार भिन्नभिन्न पुराणसंस्कर्त्यांच्या मतानें पौराणिक कालगणना तीनचार भिन्नभिन्न तऱ्हेची व कोणकोणत्या चुकीच्या सम- जांनी झाली हैं नीट कळून येईल अशी आशा आहे. ही सर्व घोटा- ळ्यांचीं भविष्य एकाच व्यासांची असणे शक्य नाहीं ! ! ! आंध्रांचा अंत २५० इ० स० व यवनांचा प्रारंभ ( सुमारे ४५० इ० स० ) यांत खरोखर २००-२५० वर्षीचें अंतर आहे; पण एवढा मध्यंतरी जो कालावकाश देण्यांत आला तो या संस्कारकर्त्यांचा वेळीं प्रचलित कलीच ३७००-३८०० वर्षे झाली होती त्यांशी वरील सर्व रकमांचा मेळ घालण्यासाठी होय ! ! ! यावरून, पुराणांत भिन्नभिन्न काळच्या व समजुतींच्या व्यक्तींनी कशीं भविष्यें जोडून तीं वाढविली आहेत, हे कळतें ! पण, या भवि- व्यभागांखेरीज सर्व भाग जुनेच आहेत; फक्त कांहीं पुराणांत मतप्रात्र- ल्याच्या वेळीं कांहीं भाग मात्र जोडण्यांत आले असावेत. हें भविष्याचें प्रकरण इ० स० ४०० सुमारास ब्रह्मांडपुराण वालीद्वीपास गेले तेव्हां त्यांत नव्हतें ! यावरून, हीं भविष्य व्यासांची नसून भिन्नभिन्न समजु- तींच्या व काळांच्या अर्वाचीन लेखकांची आहेत, हें निःसंशय सिद्ध होतें.