प्रकरण तिसरें. शुद्धोदनो राहुलब्ध* सेनजिच्छूद्रकस्तथा ॥ ग. पु. १४५-८. हाच शुद्रक राजा मृच्छकटिकाचा कर्ता असावा. कारण, प्रद्योतानें पूर्वीच्या वीतिहोत्र कुळांतील अवंतीच्या राजास मारून याचेच वेळीं तेथें आपला मुलगा पालक यास गादीवर बसविलें ! याच राज्यक्रांतीचा उल्लेख मृच्छकटिकांत आहे. ‘ आर्यपालक ' तो हाच पालक होय. शूद्रकाच्या समोर ताजी ताजी ही गोष्ट उज्जैनीस घडली असावी. यावरून वीतिहोल कुळींच्या राजांना मारून प्रद्योतानें आपलें राज्य उज्जैनीस स्थापिलें हें स्पष्ट दिसतें; याचाच पुत्र पालक ऊर्फ आर्यपालक होय ! याच वंशांतील राज- पुत्र नंदिवर्धन पुढें पाटलिपुत्रांत उदायीच्या मरणानंतर राजा झाल असावा; यामुळे हे समकालीन राजे ठरतात; जसें :- अवंति ( प्रद्योत पालक विशाखयूप अजक कीर्तिवर्धन नंदिवर्धन मगध बिंबिसार अजातशत्रु उदायी . नंदिवर्धन महानंदि कोसल प्रसेनजित् शूद्रक रणक २१३ सुरथ सुमित्र यावरून बहुधा असे वाटतें कीं, प्रद्योत कुलांतील अजकाचा पुत्र कीर्तिवर्धन ऊर्फ नंदिवर्धन हाच उदायीच्या मरणानंतर पाटलिपुत्रांत गेला असावा;
- 'सेनजित्सांप्रतं राजा भविष्यति समा नृपः • अशी एक ओळ वायु-
पुराणांतही आहे. यावरून इ. पू. ५०० पासूनच पुराणांला कालानुगामित्व आणण्याचा प्रयत्न चालला होता हैं कळून येईल.