Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराण निरीक्षण. सूर्यवंश– कोसलदेशची राजधानी बुद्धाच्या वेळीं श्रावस्ती होती. तेव्हां या नगरीत प्रसेनजित् राजा राज्य करीत होता; यास तक्षशिलेच्या युनिव्हर्सिटीत शिक्षण मिळालें होतें. हा उदारमनाचा व सज्जन होता. यानें ब्राह्मण, श्रमण व श्रावक या सर्वासच उदार आश्रय दिलेला होता. हा स्वतः बुद्धाचा शिष्य झाला; याची बहीण कोसलदेवी बिंबिसार राजास दिलेली होती. ( अजातशत्रु - बिंबिसाराचा पुत्र - या राणीचा नसून चेलना नांवाच्या विदेहराजपुत्रीचा मुलगा होता. तिलाच विदेहा किंवा विदेहदत्ता असेंही जैनांनी म्हटलेले आहे. ) २१२ , प्रसेनजित्चा पुत्र 'शूद्रक' किंवा ' क्षुद्रक या नांवाचा होता. यासच बौद्ध ' विरुद्धक ' ही म्हणत. हा बौद्धांचा मोठा शत्रु होता; याचें कारण असें कीं, प्रसेनजित्न शाक्यकुलाशी संबंध करण्याच्या हेतूनें एका शाक्यकन्येस मागणी केली; पण शाक्यांनी राजकन्येशीं त्याचा विवाह न करितां, वासवक्षत्रिया नांवाच्या दासीपुत्रीशी-ती राजकन्या आहे असें सांगून - प्रसेनजितूचा विवाह करविला, ही गोष्ट प्रसेनजितास कांही कळली नाहीं. पुढे शूद्रकास आपली उत्पत्ति शुद्रकन्येपासून झालेली आहे हें कळून आल्यामुळे त्यानें ५०० शाक्यकन्यांची कत्तल केली ! हा शूद्रेचा पुत्र म्हणून 'शूद्रक '; ( अवलांना मारण्याचें ) क्षुद्रकर्म यानें केलें म्हणून हा ' क्षुद्रक '; बौद्धांशी यानें विरोध मांडला म्हणून ते यास ' विरुद्धक ' म्हणूं लागले ! ( शाक्यांचा व प्रसेनजिताचा संबंध झाल्याप्रमाणे मात्र दिसतो; कारण पुराणांमध्यें सूर्यवंशांत शाक्यांचा संबंध आणितात. ) गरुडपुराणांत याच प्रसेनजित् व शूद्रकाचा याप्रमाणे शुद्धोदनाबरोबर व राहुलाबरोबर उल्लेख आलेला आहे :-