Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. व तेथें तो राजा झाला असावा. सारांश, हेही प्रद्योतवंशीय व मागधवं- शीय राजे समकालीन होते; प्रद्योतवंशानंतर शिशुनागवंश आला नाही. सुमित्र हा शेवटचा इक्ष्वाकुकुळांतील राजा होय ! यास इ. पू. ३८४ सालीं महापद्मानें मारिलें ! याप्रकारें बौद्धकालीन क्षत्रियराजांचें निरीक्षण केलें. २१४ मौर्यानंतरचे राजे. चंद्रगुप्ताचा राज्याभिषेक भारतीय युद्धापासून ९५१ वर्षांनी व इ. पू. ३१२ वर्षांनी झाला हैं आम्ही पाहिलेंच; आतां पुराणांच्या अर्वाचीन स्वरूपकर्त्यांनी महापद्मापासून आंध्रांच्या अंतापर्यंत ८३६ वर्षे झाली असें कां म्हटले आहे, हे आपण पाहूं. कलिंगदेशचा राजा खारवेल यानें उदयगिरी येथे ( कटकपासून १९ मैल दक्षिणेस ) हस्तिगुंफेंत एक शिलालेख कोरवून त्यांत त्यानें आपल्या राज्याची कारकीर्द दिलेली आहे. हा लेख त्यानें मौर्यकालाची १६४ वर्षे संपून १६५ वें वर्ष चालू असतां कोरविला. खारवेलानें आपल्या राज्याच्या बाराव्या वर्षी मगधदेशच्या त्यावेळच्या राजाचा पराभव केला. ( हा राजा बहुधा पुष्पमित्र शुंग असावा. .* यानें आपल्या मदतीस प्रतिष्ठानच्या शात- कर्णी राजाचें सैन्य मागविलें होतें. यावरून ( ३१२ १६५ = ) १४७ इ. पू. या वेळी दक्षिणत कोणी तरी एक शातकर्णी हें स्पष्ट दिसतें. = राज्य करीत होता पुराणांतील राजे सर्वच कांहीं मगधदेशचे नाहीत. पुराणांच्या अर्वा- चीन स्वरूपकारांस आपल्या वेळेपर्यंत जेवढे म्हणून राजे माहीत होते

  • पुष्पमित्रानें ३६ वर्षे राज्य केले असे म्हटले आहे. म्हणजे त्यानें इ. पू.

१७५-१३९ पर्यंत राज्य केलें. तेव्हां इ. पू. १४७ वर्षी खारवेलानें पराभव केलेला आसावा.