Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना पिढीस ९०-८० इतकी वर्षे केव्हाही देता येत नाहीत; फक्त २०-२२ वर्षेच देतां येतात. तेव्हां संभाव्यतेच्या दृष्टीनें ४८००, ३६००,२४०० व १२०० या मानवी वर्षीचीं युगें देखील ऐतिहासिक दृष्ट्या ग्राह्य करितां येत नाहीत, असें कांहीं पाश्चात्य व कांहीं पौर्वात्य विद्वानांचेही मत आहे. अशा प्रकारच्या युगांच्या भिन्नभिन्न अवाढव्य व्याप्तींमधून सुव्यस्थित साध्या युगांकडे व युगमन्वंतरपद्धतीकडे मी कशी वाट काढिली, पूर्वी चार वर्षोचें चतुर्युग मानवी कालगणनेस कसें घेत असत, भारतीय युद्ध ज्या द्वापरांती झालें, तें द्वापर २००० वर्षाचें नसून या ४ वर्षाच्या चौकडीं- तील तिसरें वर्ष कसें होतें, पुढे त्या द्वापरापुढीलच कलियुग ऊर्फ कलि- वर्ष याच्या अंती परिरक्षित् जन्मला हें गर्गाचें वाक्य कसें बरोबर आहे, हैं सारें मीं या उत्तरार्धीत दाखविलेलें आहे. युगांच्या व कालगणनेच्या सर्व अतिशयोक्तीच्या पद्धतींचें समालोचन करून, शेवर्टी निराशेनें The Historians' History of the World या ग्रंथमालेचे कर्ते इ० स० १९०८ साली लिहितात कीं:- १७५ “ Ancient India has no history proper. Its books fur- nish no documents on its past chronology, and its monu- ments cat not supply the place of books, since the oldest are scarcely three centuries anterior to our era. But for a small number of religious books, in which the his- torical facts are embedded under masses of legends, the. past of India would be as unknown as that of that lost Atlantis, which was destroyed by a geological cataclysm and whose story is related in the ancient traditions pre- served by Plato. " Vol II, P. 495. भारतीय इतिहास व कालगणना यांवरील दूपण थोडें तरी घालवून, त्यांच्या स्पष्टीकरणावर नवा प्रकाश पाडावा, एवढ्याकरितां हा उत्तरार्ध

  • हे ग्रंथ म्हणजे पुराणेंच होत.