Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. किंवा वर्षाला १००० नें गुणिलेले आहे, किंवा पूर्वीचें वर्ष १००० चर्षांचें होतें, असा स्पष्ट उल्लेख आहे; तसेंच, अश्वघोषाच्या बुद्धचरितांत विश्वामित्रानें १० वर्षे तप केलेल्याचा स्पष्ट उल्लेख आहे; तसेंच, राम राज्यारूढ होतांच कांहीं काळानें रजकाच्या आरोपावरून सीता वनांत सोडून देण्यांत आली, तेव्हां ती ५ - ६ महिन्यांची गरोदर होती; पुढें रामाचा अश्वमेधयज्ञ चालल्या वेळी लवकुश आले, तेव्हां त्यांचे वय १२ वर्षावर थोडेंसें झालेलें होतें; यावरून मध्यंतरी रामानें ११ वर्षच राज्य केलेले असावें, असें स्पष्ट म्हणावें लागतें; नाहीं तर ११ हजार वर्ष सांतेच्या उदरीं गर्भ राहून होता, हा तरी सिद्धांत काढावा लागेल ! सारांश, वरील सर्व गोष्टींत त्या त्या संख्यांस १००० नीं गुणिलेले स्पष्ट आढळत ल्यामुळे, दशरथही रामजन्माचे वेळी ६० हजार वर्षांचा नसून ६० वर्षांचा होता, असेंच मानणें जरूर पडतें; व तो तेव्हां वृद्ध झालेला होता, या वर्णनास हैं जुळतेही. पुढच्या पौराणिकांनीं अतिशयोक्तीनें युगेँ वाढविलीं; व त्यामुळे पौराणिक कालगणनापद्धति इतकी लोपून गेली कीं, पुढे तिचा मागमूस देखील राहिला नाहीं. इ० पू० ३०० च्या सुमाराच्या मेगॅस्थीनीसच्या वेळेस ही मोठ्या युगांची कल्पना नव्हती, इ० पू० पहिल्या शतकांतील अश्वघोषाच्या वेळी नव्हती, गर्गाच्या वेळी नव्हती; व आर्यभटापर्यंतही ही कल्पना नसावी, अशी माझी समजूत आहे; फक्त क्रमानें ४०००, ३०००, २००० व १००० वर्षांची कृत, त्रेता, द्वापर व कलि हीं युगें मात्र संधि व संध्यंतर यांसह भारताच्या सद्य:- स्वरूपकाळी आढळतात. या पद्धतीप्रमाणेंही स्वायंभुवमनूपासून भारतीय युद्धापर्यंतच्या १२० पिढ्यांस (४८०० + ३६०० + २४०० = ) १०८०० वर्षे येतात; यानें दरपिढीस ९० वर्षे पडतात. विद्वानांचें मत असें आहे कीं, कोणत्याही देशाच्या इतिहासावरून पाहिले तरी प्रत्येक = १७४